Rinku Singh Gods Plan Tattoo Photo Viral : भारतीय संघाचा युवा स्टार फलंदाज रिंकू सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिंकू सिंग आपल्या हातावर आणखी नवा टॅटू काढल्याने चर्चेत आहे. त्याच्या टॅटूमध्ये लिहिले शब्द चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. रिंकू सिंगने आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध सलग पाच षटकार मारुन कोलकाता संघाला अशक्यप्राय विजय मिळून दिला होता. तेव्हा त्यांनी बोलले खास शब्द व्हायरल झाले होते. आता तेच शब्द त्याने आपल्या टॅटूमध्ये लिहिले आहेत. ते कोणते आहेत? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिंकू सिंग आणि त्याचे ‘गॉड्स प्लॅन बेबी’हे बोलणे क्रिकेट चाहत्यांना खूप आवडते. आता रिंकू सिंगने डाव्या हातावर एक टॅटू काढला आहे. त्याने या टॅटूमध्ये लिहिले आहे, ‘गॉड्स प्लॅन’ म्हणजे देवाची योजना. रिंकू सिंगचे ‘गॉड्स प्लॅन’ हे शब्द आयपीएल २०२३ नंतर व्हायरल झाले होते. यानंतर सहकारी खेळाडूही त्याला या शब्दांवर चिडवत असतात. रिंकूने त्याचा टॅटू काढताना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचबरोबर हा टॅटू कोणाकडून काढला हेही सांगितले.

रिंकू सिंगने काढलेल्या नवीन टॅटूचा फोटो व्हायरल –

रिंकूच्या टॅटू डिझायनरने त्याच्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या टॅटूलाही चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये टॅटूची क्रेझ नवीन गोष्ट नाही. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, केएल राहुल, शिखर धवन, उमेश यादव, रवींद्र जडेजा यांसारख्या बऱ्याच भारतीय क्रिकेटपटूंनीही टॅटू काढले आहेत.

हेही वाचा – रणजी चॅम्पियन मुंबईला ‘अजिंक्य’ राखण्यासाठी रहाणे सज्ज! Irani Cup 2024 स्पर्धेत सांभाळणार धुरा

रिंकू सिंगची कारकीर्द –

रिंकू सिंगच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे तर २०२३ च्या आयपीएलनंतर त्याला भारताच्या टी-२० संघाच पदार्पण करण्याची संधी मिळाली. रिंकू सिंग २०२४ च्या टी-२० विश्वचषकात खेळू शकला नाही, परंतु या फॉरमॅटमध्ये त्याचे भविष्य खूप चांगले दिसत आहे. २६ वर्षीय रिंकू सिंगने केकेआरसाठी ४६ सामन्यांच्या ४० डावांमध्ये ८९३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये रिंकू सिंगची सरासरी २० पेक्षा जास्त आहे आणि स्ट्राइक रेट १४३.३३ आहे.

हेही वाचा – विराट कोहलीचे ‘ड्रॉईंग’ लहान मुलांपेक्षा वाईट आहे का? मांजराचा ‘स्केच’ काढतानाचा VIDEO व्हायरल

रिंकूने आयपीएलमध्ये चार अर्धशतकेही ठोकली आहेत. गेल्या दोन वर्षांत तो केकेआरसाठी चांगला फिनिशर असल्याचे सिद्ध झाले आहे. आयपीएल २०२४ चे विजेतेपद केकेआरने पटकावले होते. केकेआरने हे विजेतेपद श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली जिंकले. रिंकू सिंगने भारतासाठी आतापर्यंत दोन एकदिवसीय आणि २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer rinku singh new tattoo on his left hand gods plan photo viral in social media vbm