Rishabh Pant Car Accident Video: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात इतका भीषण होता की, दुर्घटनेनंतर मर्सिडीज कारला आग लागली. दरम्यान पंतच्या अपघाताचं सीसीटीव्हीदेखील समोर आलं असून, यामध्ये या अपघाताची भीषणता जाणवत आहे.
सीसीटीव्हीमध्ये रस्ता पूर्ण मोकळा दिसत आहे. याचवेळी पंतची कार अत्यंत वेगाने येते आणि दुभाजक तोडून पलीकडे जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. काही सेकंदांच्या या सीसीटीव्हीतून अपघात किती भीषण आहे याची कल्पना येते.
ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केलं. पंतला गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पंतना हा अपघात कसा झाला याबद्दल माहिती दिली आहे. अपघातानंतर कारला भीषण आग लागली होती. जर पंत वेळीच गाडीतून उतरू शकला नसता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
ऋषभ पंतने दिलेल्या माहितीनुसार तो स्वतः कार चालवत होता. “गाडी चालवताना झोप लागली आणि कार दुभाजकावर आदळून हा अपघात झाला. अपघातानंतर समोरची काच फोडून आपण बाहेर पडलो,” असं पंतने सांगितलं आहे. बीसीसीआयने पंतची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती दिली आहे.