भारतीय यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतचे नवीन फोटो समोर आले आहेत. कार अपघातातून सावरण्यासाठी ऋषभ पंत पूर्ण प्रयत्न करत आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंत आता आपल्या घरी आला आहे. त्याच्या पायाला अद्याप सूज आहे. त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेनंतर आता दुखापतीतून बाहेर पडून पुन्हा मैदान गाजवण्याचं त्याचं ध्येय आहे.

दरम्यान, पंतचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो कुबड्यांच्या साह्याने चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पंतचा उजवा पाय अजूनही सुजलेला आहे, हे फोटोत स्पष्टपणे दिसत आहे. पण तरीही पंतच्या पुनरागमनाच्या आशा उंचावल्या आहेत. पंतने सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Whose Hand on Rishabh Pant Shoulder Indian Cricketer Solved Mystery Behind 6 Years Old Viral Photo of 2019 World Cup
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात होता? ६ वर्ष जुन्या फोटोमागचं रहस्य अखेर उलगडलं, पंतने दिलं उत्तर
elephant doing a headstand video
खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…

संबंधित फोटोंना कॅप्शन देताना पंतने लिहिलं – “एक पाऊल पुढे… एक पाऊल मजबूत… एक पाऊल उत्तम…” संबंधित फोटोत ऋषभ पंत चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पंत सध्या आयपीएलमधून बाहेर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पदार्पण करण्याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. पण तो लवकरच मैदानात परतेल, अशी अपेक्षा आहे.

खरं तर, डिसेंबर २०२२ मध्ये ऋषभ पंत आपल्या आईला भेटण्यासाठी दिल्ली ते डेहराडून असा कारने प्रवास करत होते. तो स्वत: कार चालवत होता. त्यावेळी त्याच्या कारला भीषण अपघात झाला. त्याची बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकली. ही दुर्घटना घडल्यानंतर पंत कसा-बसा कारमधून बाहेर पडला. मात्र काही मिनिटांतच गाडीने पेट घेतला, यामध्ये पंतची कार जळून खाक झाली. या अपघातात ऋषभला गंभीर दुखापत झाली होती. मागील अनेक दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून तो अपघातातून सावरत आहे

Story img Loader