Cricketer Rishabh Pant Accident Updates : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
Rishabh Pant vs Jasprit Bumrah funny video viral
Rishabh Pant : नेट प्रॅक्सिटदरम्यान लागली पैज; बुमराह झाला बॅट्समन, बॉलिंगला ऋषभ पंत, काय झालं पुढे?
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
China Accident
China Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी, दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली

हेही वाचा – ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

या भीषण अपघातीच माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि खानपुरचे आमदार उमेश कुमार हेदेखील रुग्णालयात पोहचले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, ज्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर कारची आग विझवण्यात यश आलं.