Venkatesh Iyer shared photos of his engagement with Shruti Raghunathan : भारतीय संघाचा युवा डावखुरा खेळाडू व्यंकटेश अय्यरचा मंगळवारी साखरपुडा पार पडला. त्याने श्रुती रघुनाथनशी साखरपुडा केला. व्यंकटेश अय्यरने त्याच्या साखरपुड्याची माहिती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली. शेअर केलेल्या फोटोंमध्ये व्यंकटेश आणि श्रुती दोघेही एंगेजमेंट आउटफिट्समध्ये दिसत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. आता दोघांनाही चाहत्यांकडून आणि मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

श्रुती रघुनाथनने पीएसजी कला आणि विज्ञान महाविद्यालयातून बी.कॉम केले आहे. तसेच फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सध्या ती बंगळुरू, कर्नाटक येथील लाइफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मर्चेंडाईज प्लॅनर म्हणून काम करत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्यंकटेशने लिहिले की, “आयुष्याच्या पुढच्या अध्यायाकडे,” फोटोमध्ये व्यंकटेश हलका हिरवा कुर्ता घातलेला दिसत आहे. तसेच श्रुती जांभळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो

व्यंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी २ वनडे आणि ९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याला गेल्या वर्षीच टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली. व्यंकटेश फलंदाजीसोबत गोलंदाजीही करतो. दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त २४ धावा आल्या आहेत. याशिवाय त्याने ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १३३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजी करताना ५ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अय्यरने मध्य प्रदेशसाठी चमकदार कामगिरी केली होती.

हेही वाचा – IND vs AUS Final: मॅक्सवेलच्या पत्नीला ट्रोल करणार्‍यांवर हरभजन सिंग संतापला; म्हणाला, “खेळाडूंच्या कुटुंबीयांना…”

आयपीएलमध्ये केकेआरसाठी खेळतो –

व्यंकटेश अय्यर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. अय्यरने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३६सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १३० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ९५६ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ७ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

Story img Loader