पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत त्याने हे स्थान पटकावलंय. जवळपास तीन वर्ष भारताचा कर्णधार विराट कोहली क्रमांक एकवर होता. त्यानंतर आता त्याची क्रमांक दोनवर घसरण झाली आहे. बाबरला त्याच्या कामगिरीबद्दल दिग्गद क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने बाबर आझमला शुभेच्छा देत इशारा देणारं ट्वीट केलं आहे.
‘शुभेच्छा बाबर आझम, तुझ्या चांगल्या कामगिरीसाठी तू पात्र आहेस. मात्र टॉपवर जास्त वेळ आरामात बसू नको. कारण आम्हाला माहिती आहे विराटला चेस करणं आवडतं’, असं ट्वीट वसीम जाफरने केलं आहे. जाफरच्या ट्वीटला नेटकरी मजेशीर उत्तरं देत आहेत. दोन्ही खेळाडुंचे चाहते त्यांच्या पद्धतीने एकमेकांशी तू तू मै मै करत आहेत.
Congratulations @babarazam258, well deserved. But don’t get too comfy at the top, you know how much Virat Kohli loves chasing #ICCRankings https://t.co/Zl2i8DFHG8
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 14, 2021
आयसीसी क्रमवारीत ८६५ गुणांसह बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. तर विराट कोहली ८५७ गुणांसह दूसऱ्या स्थानावर घसरलाय. तर रोहित शर्मा ८२५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बाबर व्यतिरिक्त पाकिस्तानच्या फखर जमानसुद्धा टॉप दहामध्ये पोहोचला आहे. ७७८ गुणांसह तो सातव्या स्थानावर आहे.
Babar Azam
The Pakistan captain has overtaken Virat Kohli to become the No.1 batsman in the latest @MRFWorldwide ICC men’s ODI rankings pic.twitter.com/krxoKRDsSY
— ICC (@ICC) April 14, 2021
बाबरने २०१५ साली पाकिस्तानकडून पहिला सामना खेळला होता. तेव्हा झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. त्याचबरोबर २०१७ साली बाबरने टॉप दहामध्ये पोहोचला होता. त्याचबरोबर २०१९च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या होत्या. जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल ठरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांमध्ये बाबरने आता चौथे स्थान मिळवले आहे. त्याच्यापूर्वी झहीर अब्बास (१९८३-८४), जावेद मियांदाद (१९८८-८९) आणि मोहम्मद युसूफ यांनी ही कामगिरी केली आहे. २०१० आणि २०१२ च्या १९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा बाबर २०१५पासून पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा भाग आहे.