भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या नात्याच्या बातम्या नवीन नाहीत. रेखापासून दीपिका पदुकोणपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे नाव क्रिकेटपटूंशी जोडले गेले आहे. जनसत्ताच्या वृत्तानुसार, असे काही क्रिकेटपटू होते, जे लग्न करूनही अभिनेत्रीच्या प्रेमात पडले. या यादीत सचिन तेंडुलकरपासून सौरव गांगुलीपर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे. मास्टर ब्लास्टरच्या बाजूने कधीही प्रेमाची बातमी समोर आली नाही. पण एक अभिनेत्री त्याच्या प्रेमात नक्कीच वेडी झाली होती.

सचिन तेंडुलकर – शिल्पा शिरोडकर

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे नाव मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरसोबत जोडले गेले होते. त्यावेळी सचिनचे लग्न झाले नव्हते. या जवळीकीचे प्रमुख कारण म्हणजे दोघेही मराठी आणि एकाच संस्कृतीचे होते. मात्र, नंतर सचिनने आपल्या अफेअरच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले.

सौरव गांगुली – नगमा

सौरव गांगुली आणि नगमा यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली. त्यावेळी सौरवचे लग्न झाले होते. १९९९च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान दोघांची भेट झाली होती. जेव्हा दोघांमध्ये जवळीक वाढली तेव्हा गांगुलीच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम होऊ लागला. नंतर सौरव नगमापासून वेगळा झाला आणि दोघांचे ब्रेकअप झाले.

अजय जडेजा – माधुरी दीक्षित</strong>

धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आणि देखणा भारतीय क्रिकेटर अजय जडेजा यांच्या प्रेमाच्या चर्चाही गाजल्या होत्या. अजय जडेजा आणि माधुरी यांची भेट एका मॅगझिनच्या मुखपृष्ठाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. पण मॅच फिक्सिंग प्रकरणात अजयचे नाव आल्याने दोघांमधील वाद बिघडला. त्यानंतर दोघांचेही मार्ग वेगळे झाले.

हेही वाचा – IPL 2022 मेगा ऑक्शनबाबत ‘मोठं’ अपडेट, जाणून घ्या कधी होणार खेळाडूंचा लिलाव

किम शर्मा – युवराज सिंग

सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि मोहब्बतें फेम किम शर्मा अफेअरची बरीच चर्चा झाली. दोघे जवळपास चार वर्षे डेट करत होते आणि हे प्रकरण त्यांच्या लग्नापर्यंत पोहोचले होते. पण २००७ मध्ये अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. रिपोर्ट्सनुसार, किम-युवराजचे नाते त्याची आई शबनम सिंगला फारसे पसंत नव्हते.

दीपिका पादुकोण – युवराज सिंग

युवराज सिंगचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले असले, तरी किम शर्मानंतर त्याच्या आणि दीपिका पदुकोणच्या नात्याने त्याला सर्वाधिक चर्चेत आणले. दोघींना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आले होते. येथून दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांनाही हवा मिळाली. पण या बातम्याही लवकरच गायब झाल्या.

रवी शास्त्री – अमृता सिंग

भारताचे देखणे क्रिकेटर मानले जाणारे रवी शास्त्री अमृता सिंगच्या आयुष्यात आले. दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या. तथापि, रवीने अमृतासोबतची हे नाते संपवले कारण तिला लग्नानंतरही चित्रपटांमध्ये काम करायचे होते.

सुरेश रैना – श्रुती हासन

कमल हसनची मुलगी श्रुती हासनचे नाव सुरेश रैनासोबत जोडले गेले होते. श्रुती अनेकदा सुरेश रैनाच्या टीम चेन्नई सुपर किंग्जला सपोर्ट करताना दिसली. मात्र, नंतर सुरेश रैनाने ट्वीट करून हे वृत्त फेटाळून लावत पूर्णविराम दिला होता.

कपिल देव – सारिका

देशाला पहिल्यांदाच विश्वविजेता बनवणारा कॅप्टन कपिल देव यांनी सारिकावर आपले मन रमवले होते. एका पार्टीत दोघांची भेट झाली. रिपोर्ट्सनुसार दोघेही एकमेकांवर प्रेम करायचे. कपिलही सारिकाला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पंजाबला घेऊन गेला. मात्र, नंतर कपिलने आपला विचार बदलला आणि सारिकासोबत ब्रेकअप केल्यानंतर त्याने त्याची पूर्वीची मैत्रीण रोमी भाटियाचा हात हातात घेतला.

Story img Loader