आठवडय़ाची मुलाखत : झुलन गोस्वामी, भारताची वेगवान गोलंदाज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही वर्षांपूर्वी हातात बॅट घेऊन व क्रिकेटचा पोशाख परिधान केलेल्या महिलांकडे पाहून टीका केली जात असे. मात्र आता विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदामुळे महिला क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत. महिला क्रिकेटमध्ये आता कारकीर्द घडवायला काहीच हरकत नाही, असा विश्वास भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने व्यक्त केला आहे. भारताने २००५च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये उपविजेतेपद मिळवले होते. त्यावेळीही झुलन संघात होती. विश्वचषक स्पर्धेचा अनुभव आणि त्यानंतर भारतीय महिला क्रिकेटला आलेले सुखद दिवस याविषयी तिच्याशी केलेली खास बातचीत-

*  विश्वचषकाच्या दोन्ही उपविजेतेपदांपैकी सर्वात महत्त्वाचे कोणते?

आम्ही २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारला. त्या वेळी आम्हाला विजय मिळवण्याच्या फारशा आशा नव्हत्या. यंदा आम्ही विजेतेपदाच्या उंबरठय़ावर असताना पराभूत झालो. पूर्वीच्या तुलनेत यंदा आम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. त्याचा परिणाम म्हणजे लक्षावधी चाहत्यांचे डोळे आमच्या अंतिम सामन्याकडे लागले होते. दुर्दैवाने आम्ही इंग्लंडकडून पराभूत झालो, मात्र चाहत्यांची मने आम्हीच जिंकली. यंदाच्या उपविजेतेपदामुळे आम्हाला वलयांकित केले आहे. प्रसारमाध्यमांनीही आम्हाला उचलून घेतले. अनेक ठिकाणी आमचा सत्कार होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणूनही आम्हाला निमंत्रित केले जात आहे. ही उपविजेतेपदाचीच किमया आहे. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय महिला क्रिकेट क्षेत्रात होणार आहे.

* वेगवान गोलंदाज म्हणून महिलांना कितपत संधी आहे?

वेगवान गोलंदाजीसाठी आवश्यक असणारी उंची व शारीरिक तंदुरुस्ती माझ्याकडे उपजत असल्यामुळे मला त्याचा फायदा झाला. द्रुतगती गोलंदाज म्हणून कारकीर्द घडवायला भरपूर संधी आहेत. निर्जीव खेळपट्टीवरही प्रभावी माराच उपयोगी होतो. आपल्या देशात वेगवान गोलंदाज होण्याची क्षमता अनेक नवोदित मुलींकडे आहे. त्यांनी शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ही गोलंदाजी करताना दुखापती होण्याची शक्यता असते. त्यामुळेच अशा दुखापती कशा टाळता येतील, याला प्राधान्य दिले पाहिजे.

* महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी आयपीएलसारखी स्पर्धा उपयुक्त आहे काय?

होय, परदेशात आंतरक्लब स्पर्धामधूनच भरपूर नैपुण्य मिळत असते. आपल्याकडे महिला क्रिकेटपटूंसाठी आंतरक्लब स्पर्धावर प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. महिलांकरिताही आयपीएलच्या धर्तीवर स्पर्धा घेतली तर निश्चितपणे खेळाडूंना कारकीर्द घडवण्याचा आत्मविश्वास मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद महिलांसाठी खूप कार्य करीत आहे. आपल्या देशातही चांगले प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र आम्हा महिलांसाठीही मैदाने व अन्य क्रिकेट सुविधा अव्वल दर्जाच्या पाहिजेत. चांगल्या सुविधा व सवलती मिळाल्या तर आम्हा महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. स्थानिक स्तरावरही अधिकाधिक सामने आयोजित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे युवा खेळाडूंचा स्पर्धात्मक अनुभव समृद्ध होण्यास मदत होईल. तसेच अशा स्पर्धामधून नवोदित खेळाडूंचाही शोध घेता येईल. रेल्वे व एअर इंडिया यांच्याबरोबरच अन्य उद्योग संस्थांनीही महिला क्रिकेटपटूंना पुरस्कृत केले पाहिजे. आर्थिक पाया मजबूत असेल तर ती महिला अधिक आत्मविश्वासाने कारकीर्द घडवू शकेल.

*  स्पर्धात्मक क्रिकेटमधून केव्हा निवृत्त होणार?

सध्या तरी मी क्रिकेटखेरीज दुसरा कोणताच विचार केलेला नाही. संसार व खेळातील कारकीर्द या दोन्ही गोष्टी सांभाळणे हे महिला क्रिकेटपटूंना शक्य नसते. माझ्या अनेक खेळाडू मैत्रिणींना याबाबत आलेल्या समस्या मी अगदी जवळून पाहिल्या आहेत. जोपर्यंत तंदुरुस्तीबाबत समस्या निर्माण होत नाहीत, तोपर्यंत मी खेळतच राहणार आहे. निवृत्त झाल्यानंतरही क्रिकेटविषयक कार्य चालूच ठेवणार आहे. क्रिकेट हा माझा श्वास आहे. नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण द्यायला मला निश्चितपणे आवडेल.