भारतीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनी दुखापतीमुळे भारत अ संघातून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड अ संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना बंगळूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघ घोषित केला होता. आता या संघात एक मोठा बदल झाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप संनीला दुखापत झाल्याचे समोर येत आहे.

दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नवदीपला दुखापत झाली आहे. त्या स्पर्धेत तो उत्तर विभाग संघाचा एक भाग आहे. नवदीपच्या जागी ऋषी धवनचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे. नवदीप सैनीला उजव्या बाजूला ग्रोइन एंजरी झाली आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे सैनीच्या दुखापतीची माहिती दिली. संजू सॅमलन या संघाचे नेतृत्व करणार आहे.

नवदीप सैनीने टीम इंडियासाठी दोन कसोटी, ८ एकदिवसीय आणि ११ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान नवदीपने एकदिवसीयमध्ये ६, कसोटीत ४ आणि टी२० प्रकारात १३ विकेट घेतल्या आहेत. आयपीएल मध्येही तो ३० सामने खेळला आहे. दुलीप ट्रॉफी चषकामध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंड अ विरूद्ध होणारी ही एकदिवसीय मालिका सप्टेंबर २२ पासून सुरू होणार आहे. ही मालिका चेन्नईमध्ये होणार असून या मालिकेतील पुढील दोन सामने हे २५ आणि २७ सप्टेंबरला होणार आहेत.

Story img Loader