कोणत्याही संघाची निवड प्रक्रिया ही अत्यंत कठीण गोष्ट असते. अनेक खेळाडू देशाच्या राष्ट्रीय संघात आपली निवड व्हावी यासाठी वर्षभर खडतर मेहनत घेत असतात. अनेक खेळाडू कित्येक वर्षं प्रतीक्षेत असतात. संघात निवड होणाऱ्या खेळाडूंना आपण संघात कायम राहू हे निश्चित करण्यासाठी सातत्याने चांगला खेळ करावा लागतो. पण चांगला खेळ किंवा खेळाशी संबंधित इतर गोष्टी बाजूला ठेवून देशाच्या राष्ट्रीय संघात चक्क ज्योतिष्याच्या सल्ल्याने खेळाडूंची निवड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या काही महत्त्वाच्या सामन्यांच्या आधी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी चक्क ज्योतिष्याच्या सल्ला घेऊन काही खेळाडूंना अंतिम संघात स्थान दिलं नाही. तसेच काही खेळाडूंच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल केल्याचंही समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ

एशियन कप क्वालिफायरच्या सामन्यांआधीच्या घडामोडी…

या वृत्तानुसार, गेल्या वर्षी कोलकात्यामध्ये झालेल्या एशियन कप क्वालिफायर सामन्यांसाठी ज्या भारतीय फुटबॉल संघाची निवड झाली, त्यात मुख्य प्रशिक्षक इगोर स्टायमॅक यांनी भूपेश शर्मा नावाच्या एका ज्योतिष्याच्या मदत घेतली होती. विशेष म्हणजे, भूपेश शर्मा यांच्याबाबतचा सल्ला स्टायमॅक यांना भारतीय फुटबॉल महासंघाचे तत्कालीन सरचिटणीस कुशल दास यांनीच दिला होता!

गेल्या वर्षी जून महिन्यात भारतीय फुटबॉल संघाने एकूण चार सामने खेळले. त्यातील पहिला मैत्रीपूर्ण सामना जॉर्डनच्या संघाशी होता. मात्र, त्यानंतर तीन एशियन कप क्वालिफायर सामने अनुक्रमे कंबोडिया, अफगाणिस्तान व हाँगकाँग या देशांशी खेळवण्यात आले. या सर्व सामन्यांआधी प्रशिक्षक स्टायमॅक यांनी संघनिवडीबाबत ज्योतिषी भूपेश शर्मा यांची मदत घेतली होती, हे त्या दोघांच्या उघड झालेल्या मोबाईल संदेशांमधील संभाषणावरून स्पष्ट झालं आहे.

प्रत्येक खेळाडूनिशी दिला जायचा सल्ला!

सामन्याच्या आधी मुख्य प्रशिक्षक स्टायमॅक भूपेश शर्मा यांना खेळाडूंची यादी पाठवत असतं. यातील प्रत्येक खेळाडूच्या नावापुढे ‘चांगला’, ‘चांगलं करू शकतो, पण अतीआत्मविश्वास टाळायला हवा’, ‘याच्यासाठी आज चांगला दिवस नसेल’, ‘याच्यासाठी खूप चांगला दिवस असेल, पण हा कदाचित अतीआक्रमक होऊ शकतो’, ‘या सामन्यासाठी हा योग्य नाही’, अशा प्रकारचे सल्ले भूपेश शर्मा यांच्याकडून दिले जात असत.

ऐन सामन्याआधी दोन प्रमुख खेळाडू बाहेर!

दरम्यान, गेल्या वर्षी ११ जून रोजी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या क्वालिफायर सामन्याच्या अवघ्या तासभर आधी दोन प्रमुख खेळाडूंना संघाबाहेर बसवण्यात आलं होतं. यामागे ज्योतिषी भूपेश शर्मा यांचा सल्लाच असल्याचं त्यांच्या संभाषणावरून दिसत असल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. या दोघांमध्ये अशा प्रकारच्या संभाषणाचे जवळपास १०० मेसेजेस उघड झाले असून हे संभाषण प्रामुख्याने मे व जून २०२२ मध्ये झालं आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणी ज्योतिषी भूपेश शर्मा यांची प्रतिक्रिया मिळू शकली नसल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. तसेच, तत्कालीन भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आपल्याला या घडामोडीची माहिती नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, सरचिटणीस कुशल दास यांनी या सर्व प्रकाराला दुजोरा दिला आहे.

“मी शर्मांना एका मीटिंगमध्ये भेटलो. त्यांनी अनेक टेलिकॉम कंपन्या व बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी काम केलं आहे. त्या दिवसांमध्ये भारतीय संघ एशियन कपसाठी पात्र होईल का? याची मला व प्रशिक्षक स्टायमॅक यांनाही चिंता होती. माझ्यासाठी ती सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे मी शर्मांना म्हणालो की तुमची स्टायमॅक यांच्याशी भेट करून देतो. त्यांना पटलं तर ते पुढे बोलतील. स्टायमॅक यांनाही शर्मांचा सल्ला पटला आणि पुढे कोलकात्यात ते दोन महिने संपर्कात होते”, अशी प्रतिक्रिया कुशल दास यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. यासाठी भूपेश शर्मा यांना १२ ते १५ लाख रुपये दिल्याचंही दास यांनी सांगितलं.

“भूपेश यांचं नाव मला सुचवण्यात आलं होतं. त्यांच्या कौशल्याचा मी वापर करून घ्यावा असाही सल्ला मला देण्यात आला होता. पण त्यापेक्षा जास्त काहीही नव्हतं”, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक इगोर स्टायमॅक यांनी दिली आहे.