भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद अलिकडच्या काळात जागतिक स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करताना दिसत आहे. शुक्रवारी त्याने आणखी एक विजयी कामगिरी केली आहे. नॉर्वे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात व्ही प्रणितला पराभूत करत विजेतेपद पटकावले आहे.
हेही वाचा >>> “…तर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपाला मतदान केलं असतं”, नवनीत राणा यांचा खळबळजनक दावा
नॉर्व्हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आर प्रज्ञानंदने सुरुवातीपासून चांगला खेळ करुन दाखवला. त्याने प्रणितबरोबरच व्हिक्टर मिखालेव्हस्की (8वी फेरी), विटाली कुनिन (6वी फेरी), मुखमदझोखिद सुयारोव (चौथी फेरी), सेमेन मुतुसोव्ह (दुसरी फेरी) आणि मॅथियास अनेलँड (पहिली फेरी) यांचा पराभव केला. तर त्याने खेळलेले इतर तीन सामने अनिर्णित राहिले.
हेही वाचा >>> राज्यसभा निवडणूक : भाजपाच्या विजयानंतर रामदास आठवलेंची शिवसेनेवर टीका, म्हणाले ‘बड्या बड्या वाघांची…’
या स्पर्धेमध्ये सातत्याने विजयी कामगिरी करत प्रज्ञानंदने सर्वाधिक असे ७.५ गुण मिळवले. दुसऱ्या क्रमांकावर मार्सेल एफ्रोइम्स्की (इस्त्रायल) आणि जंग मिन सेओ (स्वीडन) होते. प्रज्ञानंद या दोघांपेक्षा एक अकं पुढे आहे. प्रणित सहा अंकांसह संयुक्त रुपात तिसऱ्या स्थानावर होता. मात्र स्पर्धेच्या शेवटपर्यंत तो सहाव्या स्थानापर्यंत घसरला.
हेही वाचा >>> मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, सुभाष देसाईंची मागणी; स्वत: लक्ष घालण्याचे अमित शहा यांचे आश्वासन
दरम्यान, भारतीय स्ठाट ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने याआधीही ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत जगातील सर्वोत्तम म्हटला जाणाऱ्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं होतं. तर चीनच्या डींग लिरेनविरोधात खेळताना त्याने पराभव स्वीकारला होता.