नवी दिल्ली : भारताचा अनुभवी हॉकी गोलरक्षक पी.आर.श्रीजेशने १८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला पॅरिस ऑलिम्पिकनंतर पूर्णविराम देण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. श्रीजेश चौथ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळत असून, अनेक राष्ट्रकुल आणि विश्वचषक स्पर्धेसह तब्बल ३२८ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव श्रीजेशच्या गाठीशी आहे.

‘‘ऑलिम्पिकनंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेताना मागे वळून बघतो तेव्हा मला स्वत:चाच खूप अभिमान वाटत आहे. हा प्रवास काही विलक्षण नव्हता. माझे कुटुंब, सहकारी, प्रशिक्षक, चाहते आणि हॉकी इंडिया अशा प्रत्येकाकडून मिळालेल्या प्रेम आणि प्रोत्साहनाच्या बळावरच मी इथपर्यंत येऊ शकलो. या प्रत्येकाचा मी सदैव ऋणी राहीन,’’ असे श्रीजेशने निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना सांगितले.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Indian captain Rohit Sharma attends Mumbai Ranji cricket team practice session sports news
रोहितची सरावास हजेरी; मुंबई रणजी संघाच्या वानखेडेवरील सत्रात रहाणेसह फलंदाजी
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी

‘‘आजपर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उतार बघितले. कठीण काळही बघितला, तसा उत्कटतेचे क्षणही अनुभवले. याच अनुभवाच्या शिदोरीवर आता पॅरिसमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून टोक्योतील पदकाचा रंग बदलायची जिद्द बाळगली आहे,’’ असेही श्रीजेश म्हणाला.

‘‘टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कांस्यपदक विजयात श्रीजेशचा वाटा मोठा होता. त्याचा अनुभव भारतीय संघाला निश्चित मार्गदर्शकच नाही, तर प्रेरणादायी ठरणारा आहे. श्रीजेशसाठी ही शेवटची स्पर्धा संस्मरणीय करण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावेल,’’ असे भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सांगितले.

हेही वाचा >>> IND vs SL: टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, नव्या कर्णधाराची केली घोषणा; अनुभवी खेळाडूला डच्चू

‘‘संघातील बहुतेक खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात होत असताना श्रीजेशने प्रत्येकाच्या खेळाला आकार दिला. स्वत:चा मार्ग शोधण्याचा सल्ला दिला. श्रीजेशने आता निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आम्हाला त्याच्यासाठी जिंकायचे आहे, ऑलिम्पिकच्या विजयमंचावर पुन्हा एकदा उभे रहायचे आहे,’’असेही हरमनप्रीत म्हणाला.

‘‘मी कर्णधार असताना श्रीजेशने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हा तो १८-१९ वर्षांचा असेल. पदार्पणापासूनच त्याच्या खेळात वेगळेपण होते. त्याचे हॉकीतील योगदान कधीच विसरता येणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे एखादाच खेळाडू टिकू शकतो. श्रीजेशचा निर्णयच भारतीय हॉकी संघाला सलग दुसऱ्या पदकासाठी प्रेरित करेल. पॅरिसमधील यश म्हणूनच भारतीय हॉकीसाठी खास असेल,’’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांनी सांगितले.

‘‘श्रीजेशच्या निर्णयाचा हॉकी इंडिया आदर करते. श्रीजेशसाठी संपूर्ण संघ एकत्रितपणे खेळेल आणि भारतीयांसाठी ही स्पर्धा खास ठरेल,’’असे हॉकी इंडियाचे सचिव भोलानाथ सिंह यांनी म्हटले आहे.

श्रीजेशची कारकीर्द

●२००६ दक्षिण आशियाई स्पर्धेतून पदार्पण

●२०११, २०१६, २०१८, २०२३ आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत विजेतेपद

●२०१४, २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, २०१८ मध्ये कांस्य

●२०१६, २०१८ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रौप्यपदक

●२०१९ ‘एफआयएच’ हॉकी लीगमध्ये विजेतेपद

●२०२० टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक

२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

भारताचे ऑलिम्पिक सामने

भारत वि. न्यूझीलंड (२७ जुलै)

भारत वि. अर्जेंटिना (२९ जुलै)

भारत वि. आयर्लंड (३० जुलै)

भारत वि. बेल्जियम (१ ऑगस्ट)

भारत वि. ऑस्ट्रेलिया (२ ऑगस्ट)

श्रीजेशचा सन्मान

●मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (२०२१)

●वर्षातील सर्वोत्कृष्ट जागतिक खेळाडू (२०२१)

●‘एफआयएच’चा सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट गोलरक्षक (२०२१ व २०२२)

Story img Loader