भारतात हॉकी खेळ चालवण्यासाठी भारतीय हॉकी असोसिएशनच्या तीन सदस्यीय विशेष समितीने हॉकी इंडियाला कौल दिला आहे. मात्र हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी संघटना (आयएचएफ) यांच्यापैकी कोणत्या संघटनेला अधिकृत मान्यता द्यायची, याचा निर्णय आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) ३ नोव्हेंबरला क्वालालंपूर येथे होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.एफआयएचचे अध्यक्ष केली फेअरवेदर यांनी हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा आणि आयएचएफचे अध्यक्ष आर. के. शेट्टी यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, ‘‘अंतिम निर्णय क्वालालंपूर येथे होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. भारताला एफआयएचचे सदस्य देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. ’’

Story img Loader