IND beat KOR by 4-1 in Asian Champions Trophy Semifinal: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ च्या अंतिम फेरीत भारतीय हॉकी संघाने धडक मारली आहे. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा ४-१ ने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघासाठी खेळाडूंनी एकजुटीने कामगिरी केली आणि कोरियन संघ भारतीय संघासमोर टिकू शकला नाही. भारताने हा सामना ४-१ ने जिंकला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. उपांत्य फेरीत चीनने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
सध्याची चॅम्पियन टीम इंडिया आपल्या पाचव्या विजेतेपदाच्या जवळ पोहोचली आहे. टीम इंडियाच्या विजयाचा स्टार पुन्हा एकदा कर्णधार हरमनप्रीत सिंग ठरला ज्याने दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तर जरमनप्रीत सिंगला सामन्याचा सामनावीर घोषित करण्यात आले. जरमनने उत्कृष्ट गोल करत संघाला विजयाच्या जवळ नेले.
भारतीय संघाच्या खेळाडूंनी पहिल्या क्वार्टरमध्येच आक्रमक खेळ दाखवत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. पहिला क्वार्टर संपण्यापूर्वी १३व्या मिनिटाला उत्तम सिंगने टीम इंडियासाठी पहिला गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या क्वार्टरमध्ये २-० अशी आघाडी झाली. यावेळी सामन्याच्या १९व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरून दमदार शॉट मारून गोल केला. टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये २ गोल केले.
हेही वाचा – Younis Khan: “खेळण्यापेक्षा बडबडच जास्त…”, बाबर आझमला सुनावताना पाकिस्तानच्या युनूस खानने विराट कोहलीबाबत केलं मोठं वक्तव्य
जरमनप्रीत सिंगने ३२व्या मिनिटाला स्कोअर ३-० असा केला मात्र एका मिनिटानंतर कोरियाला प्रथमच गोल करण्यात यश मिळाले. त्यासाठी यांग जिहुनने ३३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला हरमनप्रीतने पुन्हा एकदा गोल नोंदवत विजयावर शिक्कामोर्तब केले. शेवटच्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही आणि भारतीय संघाने ४-१ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.
भारताचा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अंतिम सामना चीनविरूद्ध
अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना चीनशी होईल, ज्याने पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. या उपांत्य फेरीत ६० मिनिटे सामना १-१ असा बरोबरीत राहिला, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटने निर्णय घेण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना एकही गोल करता आला नाही, तर चीनने २ गोल करत सामना २-० असा जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. हा अंतिम सामना मंगळवार १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघ साखळी टप्प्यातील त्यांच्या पहिल्याच सामन्यात भिडले होते, ज्यामध्ये भारताने चीनचा ३-० असा पराभव केला होता.