भारतीय खेळाडूंसाठी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये बुधवारचा दिवस निराशाजनक ठरला. पुरुष गटांत त्यांना १२व्या मानांकित क्युबाने २.५-१.५ अशा फरकाने हरविले. महिलांमध्ये सर्बियाने भारताला त्याच फरकाने पराभवाचा धक्का दिला.
परिमार्जन नेगीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या एस. पी. सेतुरामनने बलाढय़ खेळाडू लिनिआर डॉमिनेझ पेरेझला बरोबरीत रोखले. कृष्णन शशिकिरणने लाझारो ब्रुझान बाटिस्टा याच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, मात्र त्याला हा डाव बरोबरीत स्वीकारावा लागला. बी.अधिबनलाही युनिस्की क्युसेदा पेरेझ याच्याविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. शेवटच्या लढतीत भारताच्या एम. आर. ललित बाबूला रिनाल्डो ओरिट्ज सोरेझने पराभूत करीत क्युबाला विजय मिळवून दिला. या सामन्यातील पराभवामुळे भारत १२व्या स्थानावर फेकला गेला.
महिलांमध्ये भारताच्या द्रोणावली हरिकाने पहिल्या लढतीत जोवाना व्होजिनोविकवर शानदार विजय मिळविला. मात्र नंतरच्या लढतींमध्ये भारताच्या तानिया सचदेव व मेरी अॅन गोम्स यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अँजेलिजा स्टोजानोविकने तानियाला तर मारिजा रॅकिकने गोम्स हिला हरविले. त्यामुळे सर्बियाला २-१ अशी आघाडी मिळाली. शेवटच्या लढतीत पद्मिनी राऊतला अॅदेला व्हेलिकिकने बरोबरीत रोखले आणि संघाला विजय मिळवून दिला.
भारतासाठी निराशाजनक दिवस
भारतीय खेळाडूंसाठी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये बुधवारचा दिवस निराशाजनक ठरला. पुरुष गटांत त्यांना १२व्या मानांकित क्युबाने २.५-१.५ अशा फरकाने हरविले.
First published on: 07-08-2014 at 04:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian men and women suffer defeats in chess olympiad