पीटीआय, पॅरिस

भारतीय पुरुष हॉकी संघाने गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या भक्कम कामगिरीच्या जोरावर ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने रविवारी ग्रेट ब्रिटनचे आव्हान नियोजित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये ४-२ असे परतवून लावले.

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
maharashtra vidhan sabha election 2024 hasan mushrif vs samarjit ghatge
लक्षवेधी लढत : मुश्रीफ- घाटगेंमध्ये पुन्हा लढत फक्त पक्ष बदलून
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूविरुद्ध स्टिक उगारल्याने भारताच्या अमित रोहिदासला लाल कार्ड दाखवून थेट बाहेर काढण्यात आले. त्यानंतरही दहा खेळाडूंसह खेळताना ४० मिनिटे भारताने धैर्याने लढत देत ग्रेट ब्रिटनला १-१ असे बरोबरीत रोखले. या स्पर्धेत भारताने हवेतून लांबपल्ल्याचे पास देण्यावर भर दिला होता. मात्र, ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी भारताच्या या लकबीचा अभ्यास करून सामन्यावर नियंत्रण मिळविले होते. भारताला संपूर्ण सामन्यात संघर्ष करावा लागला. मात्र, त्यांनी सामना गमावणार नाही याची काळजी घेतली. आपल्या अखेरच्या स्पर्धेत खेळत असलेल्या श्रीजेशने जवळपास एकाहाती भारताचे आव्हान सांभाळले. ब्रिटनविरुद्ध श्रीजेश असाच खेळ बऱ्यापैकी पाहायला मिळाला.

हेही वाचा >>>IND vs SL 2nd ODI : टीम इंडियाच्या फलंदाजांचे जेफ्री व्हँडरसेसमोर सपशेल लोटांगण, यजमान श्रीलंकेचा ३२ धावांनी दणदणीत विजय

सामन्याच्या २२व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडीवर नेले. मात्र, भारताला ही आघाडी कायम राखता आली नाही. पाचच मिनिटांनी वेगवान चाल रचून ली मॉर्टनने ब्रिटनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर एका क्षणी झालेल्या तणावपूर्ण प्रसंगात रोहिदासला लाल कार्ड मिळाल्याने भारताला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. भारताचे संख्याबळ कमी झाल्यावर ब्रिटनने आपले आक्रमण तीव्र केले. एक बचावपटू कमी झाल्यावरही संघातील अन्य खेळाडूंनी परिस्थिती जाणून घेत आपल्या जागा बदलल्या आणि ब्रिटनला थोपवून धरले. श्रीजेशसमोर ब्रिटनचे आक्रमक निष्प्रभ ठरले. उत्तरार्धात आक्रमणाच्या बरोबरीने बचावाच्या आघाडीवर अधिक खेळ झाल्याने सामना बरोबरीत राहिला.

शूटआऊटमध्ये दोन्ही संघांच्या पहिल्या दोन प्रयत्नांनंतरही २-२ अशी बरोबरी कायम होती. पण, नंतर पुन्हा एकदा श्रीजेश भारतासाठी धावून आला. त्याने कॉनर विल्यम्स आणि फिलिप रॉपरचे प्रयत्न फोल ठरवून भारताचा विजय निश्चित केला. भारताकडून हरमनप्रीत, सुखजीत सिंग, ललित उपाध्याय, राजकुमार पाल यांचे प्रयत्न यशस्वी ठरले.

महत्त्वाच्या सामन्यात एका खेळाडूला गमवावे लागल्याचा आम्हाला फटका बसला नाही. आम्ही प्रशिक्षणाच्या कालावधीत अशा परिस्थितीचीही उजळणी घेतो. त्यामुळे अमित गेल्यावर मी बचावपटूच्या भूमिकेत आलो. एक चांगला विजय आम्ही मिळवला. श्रीजेशविषयी काय बोलायचे, तो तर आम्हाला अशा वेळी नेहमी वाचवतो. श्रीजेश मोठ्या स्पर्धेचा खेळाडू आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही,’’ असे मत मनप्रीत सिंगने व्यक्त केले.

हेही वाचा >>>Paris Olympics 2024: नोव्हाक जोकोव्हिचची ऑलिम्पिक सुवर्णपदकाला गवसणी, अल्काराजचा पराभव करत घडवला इतिहास

रोहिदासच्या उपांत्य फेरीतील उपलब्धतेविषयी संदिग्धता

उपांत्यपूर्व लढतीत भारताचा बचावपटू अमित रोहिदासला लाल कार्ड दाखवून पंचांनी बाहेर काढले होते. आता त्याच्या उपांत्य फेरीत खेळण्याविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूवर स्टिक उगारल्यामुळे पंचांनी रोहिदासला बाहेर काढले होते. भारतीय संघ तब्बल ४० मिनिटे दहा खेळाडूंसह खेळला. फुटबॉलमध्ये अशा पद्धतीने खेळाडूला बाहेर काढल्यावर तो खेळाडू पुढील लढतीसाठी अपात्र ठरतो. हॉकीमध्ये अद्याप असा नियम नाही. आता पंच या संदर्भात आपला अहवाल तांत्रित समितीला सादर करतील. नंतर त्या घटनेची ध्वनिचित्रफीत पाहिली जाईल आणि त्या वरून रोहिदासचे कृत्य हेतुपूर्वक होते की अनवधानाने हे तपासले जाईल. एकूणच या घटनेच्या तीव्रतेवर निर्णय अवलंबून राहणार असल्याने रोहिदासच्या उपांत्य फेरीतील खेळण्याविषयी अद्याप संदिग्धताच आहे.दरम्यान, शूट—आऊट दरम्यान ग्रेट ब्रिटनचा गोलरक्षक ऑली पेन प्रत्येक शॉटपूर्वी गोलपोस्टच्या मागे आपल्या आय—पॅडवरून बचावाचा सल्ला घेत होता. भारतीय खेळाडूंनी हे निदर्शनास आणल्यावर आय—पॅड सहाय्यक प्रशिक्षकाकडे सुपूर्द करण्यात आले.

सामन्यातील शूटआऊट

इंग्लंड भारत

अल्बेरी जेम्स ● (११) हरमनप्रीत सिंग 

वॅल्लेस झॅक ● (२२) सुखजित सिंग 

विल्यम्सन कॉरन x (२३) ललितकुमार उपाध्याय 

रॉपर फिलिप x (२४) राजकुमार पाल