India vs Afghanistan T20 Final Match Updates: आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. पावसामुळे शनिवारी (७ ऑक्टोबर) सामना रद्द करण्यात आला. भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा अफगाणिस्तानने १८.२ षटकात ५ गडी गमावून ११२ धावा केल्या होत्या. त्यानंतर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आयसीसी टी-२० क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले. या क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय पुरुष क्रिकेट संघ प्रथमच एशियाडमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला आणि सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी २०१० मध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते, तर २०१४ मध्ये श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. अफगाणिस्तानचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हांगझोऊ येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाने १८.२ षटकांत ५ गडी गमावून ११२ धावा केल्या होत्या. यानंतर पावसाने व्यत्यय आणल्याने सामना पुढे जाऊ शकला नाही. अफगाणिस्तानसाठी सुरुवात अजिबात चांगली झाली नव्हती. संघाने दुसऱ्या षटकात ५ धावांवर पहिली विकेट गमावली . सलामीवीर झुबैद अकबरी ५ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – Asian Games: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, ९ वर्षांनी सुवर्णपदकावर कोरले नाव

अफगाणिस्तानचा डाव असा राहिला –

अफगाणिस्तानच्या डावाबद्दल बोलायचे झाले, तर शाहिदुल्ला कमालने सर्वाधिक नाबाद ४९ धावा केल्या. कर्णधार गुलबदिन नायब २७ धावा करून नाबाद राहिला. अफसर जझाईने १५ धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. जुबैद अकबरी पाच धावा करून बाद झाला, तर मोहम्मद शहजाद चार धावा करून बाद झाला. नूर अली झद्रान आणि करीम जनात यांनी प्रत्येकी एक धाव काढली. भारताकडून अर्शदीप सिंग, शिवम दुबे, शाहबाज नदीम आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian mens cricket team wins asian games gold medal on back of icc t20 rankings in final match canceled due to rain vbm
Show comments