Indian men’s kabaddi team defeated Pakistan to enter the final: आशियाई क्रीडा २०२३ स्प पुरुष कबड्डी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने हा सामना ६१-१४ अशा फरकाने जिंकला. या विजयासह आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताचे आणखी एक रौप्य पदक निश्चित झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्याची सुरुवात भारतासाठी खराब झाली. पाकिस्तानने सुरुवातीला एक-एक करून चार गुणांची आघाडी घेतली होती. पण त्यानंतर भारतीय रेडर्स आणि डिफेंडर्स इतके आक्रमक झाले की त्यांनी काही मिनिटांतच पाकिस्तानच्या हातून सामना काढून घेतला. पहिल्या हाफ टाइमपर्यंत भारताने पाकिस्तानला तीनदा ऑलआउट केले आणि आघाडी ३०-५ अशी वाढवली.

दुसऱ्या हाफ टाइममध्येही भारतीय खेळाडूंची आक्रमक वृत्ती कायम राहिली. या हाफ टाइममध्ये भारताने पाकिस्तानला आणखी तीन वेळा ऑलआउट केले. म्हणजे संपूर्ण सामन्यात पाकिस्तानचा संघ ६ वेळा ऑलआऊट झाला. मात्र, भारतीय संघ एकदाही ऑलआऊट झाला नाही.

हेही वाचा – Asian Games: तिलक वर्माने आईला दिलेले वचन केले पूर्ण, जाणून घ्या जर्सी वर करून का केले सेलिब्रेशन? पाहा VIDEO

अंतिम फेरीत इराणशी सामना होऊ शकतो –

भारताच्या या शानदार विजयानंतर कबड्डी चाहते सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंचे कौतुक करत आहेत. कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयासाठी भारतीय चाहत्यांनीही प्रार्थना सुरू केली आहे. कबड्डीचा दुसरा सेमीफायनल सामना इराण आणि चायनीज तैपेई यांच्यात आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय संघाचा सामना या सामन्यातील विजेत्याशी होणार आहे. कदाचित भारताची स्पर्धा इराणशीच असेल. कबड्डीत इराण हे मोठे नाव आहे. गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही तो चॅम्पियन ठरला होता.

भारताने आतापर्यंत किती पदके जिंकली?

सुवर्ण: २१
रौप्य: ३३
कांस्य: ३७
एकूण: ९१

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian mens kabaddi team defeated pakistan to enter the final of 19th asian games 2023 vbm
Show comments