भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदासाठी अभयसिंग चौताला व रणधीरसिंग यांच्यातील चुरस वाढली आहे. दोन्ही संघटकांना विविध संघटनांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. ही निवडणूक २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
चौताला यांना भारतीय वुशु महासंघाचे सरचिटणीस मनीष कक्कर, टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस धनराज चौधरी, मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघाचे सरचिटणीस नामदेव शिरगांवकर, नेटबॉल महासंघाचे अध्यक्ष वागेश पाठक, जिम्नॅस्टिक्स महासंघाचे अध्यक्ष जसपालसिंग कंधारी यांनी पाठिंबा दिला आहे.
रणधीरसिंग यांना रायफल नेमबाजी , ज्युदो महासंघ, लॉन बाऊलिंग, कबड्डी, नेटबॉल या क्रीडाप्रकारांच्या राष्ट्रीय महासंघांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
सहा वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रणधीरसिंग यांनी भारतीय ऑलिम्पिक महासंघावर अनेक वर्षे विविध पदांवर काम केले आहे. दरम्यान मणिपूर राज्य ऑलिम्पिक महासंघानेही त्यांना पाठिंबा दिला आहे.
चौताला व रणधीर यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस
भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदासाठी अभयसिंग चौताला व रणधीरसिंग यांच्यातील चुरस वाढली आहे. दोन्ही संघटकांना विविध संघटनांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. ही निवडणूक २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
First published on: 10-11-2012 at 01:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian olympic election