Ravichandran Ashwin comment on Gautam Gambhir: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता टीम इंडियाच्या एका दिग्गज खेळाडूने त्याच्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर हा २००७ मध्ये टी२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. अश्विनने विश्वचषक सुरु होण्यास काही अवधी बाकी असताना एका मुलाखतीत गौतम गंभीरबाबत सूचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे त्यांच्या कामगिरीनुसार अधिक श्रेय घेण्यासाठी पात्र आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्याला जेवढे श्रेय मिळायला हवे होते ठेवढे मिळाले नाही, असे म्हणता येईल. रविचंद्रन अश्विनने अशाच एका खेळाडूचे नाव घेतले आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीत म्हणावे तितके श्रेय मिळाले नाही. हर्षा भोगले यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान अश्विनने सांगितले की, “गौतम गंभीर हा एक असा खेळाडू आहे त्याला जेवढे श्रेय मिळायला हवे होते तेवढे मिळाले नाही.”

Sourav Ganguly agrees with Gautam Gambhir opinion
Sourav Ganguly : ‘तो जे बोलला ते योग्यच…’, गौतम गंभीरने रिकी पॉन्टिंगला दिलेल्या प्रत्युत्तरावर सौरव गांगुलीचे वक्तव्य
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Gautam Gambhir Press conference Team is prepared with Abhimanyu Easwaran and KL Rahul as potential replacements for the opening slot
Gautam Gambhir : रोहित शर्मा नाही तर कोण…? बुमराह नेतृत्व करणार अन् ‘हा’ खेळाडू देणार सलामी, गौतम गंभीरने केलं स्पष्ट

आर. अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, “गौतम गंभीर हा भारताचा एक महान क्रिकेटपटू आहे. ज्यांना सर्वात कमी महत्व मिळाले असे मला वाटते. तो संघाचा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे पण, लोकांनी त्याला जितके श्रेय द्यायला हवे होते तितके दिले नाही.” पुढे अश्विन म्हणाला की, “तो एक निःस्वार्थ व्यक्ती होता आहे जो आपल्या कारकिर्दीत नेहमी संघाचा विचार करत असे.” मात्र, अश्विनने गौतम गंभीरबद्दल असे का म्हटले. त्याबद्दल सांगणे थोडे कठीण आहे. याआधी गौतम गंभीरने युवराज सिंगबद्दल म्हटले होते की, “त्याला इतके श्रेय मिळाले नाही.”

गंभीरने दोन विश्वचषक जिंकले

गौतम गंभीरने २००७च्या विश्वचषक फायनलमध्ये चांगली कामगिरी केली होती. पाकिस्तानविरुद्ध सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना त्याने ५४ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. गंभीरमुळेच टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. भारताला २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात गौतम गंभीरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने कठीण परिस्थितीत ९७ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार मारले. भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला.

हेही वाचा: Asian Games 2023: महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने वाढवली शान! अविनाश साबळेने एशियन गेम्समध्ये सलग दुसरे पदक जिंकत रचला इतिहास

गौतम गंभीरची कारकीर्द

गंभीरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी एकूण २४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, २८३ डावात त्याच्या बॅटने १०३२४ धावा केल्या आहेत. गंभीरच्या कसोटीत ४१५४ धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५२३८ आणि टी२० क्रिकेटमध्ये ९३२ धावा आहेत.