राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ची क्रीडाज्योत १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी भारतात येणार असली तरी भारताच्या अव्वल खेळाडूंना ही क्रीडाज्योत घेऊन धावता येणार नाही. सुरक्षाव्यवस्थेमुळे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने हा सोहळा भव्यदिव्य न करण्याचे ठरवले आहे.
‘‘नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही क्रीडाज्योतीचे सन्मानपूर्व स्वागत करणार आहोत. मात्र ही क्रीडाज्योत घेऊन एकही धावपटू धावणार नाही. दसरा असल्यामुळे या कार्यक्रमासाठी सुरक्षा पुरवण्यास नकार मिळाला आहे. त्याचबरोबर ग्लास्गो येथील राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजकांनीही हा कार्यक्रम पुढे ढकलता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे,’’ असे आयओएचे प्रमुख विजय कुमार मल्होत्रा यांनी सांगितले.
भारतीय खेळाडू राष्ट्रकुल क्रीडाज्योत घेऊन धावणार नाहीत
राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ची क्रीडाज्योत १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी भारतात येणार असली तरी भारताच्या अव्वल खेळाडूंना ही क्रीडाज्योत घेऊन धावता येणार नाही.
First published on: 04-10-2013 at 01:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian players do not participate in torch race of commonwealth games