राष्ट्रकुल स्पर्धा २०१४ची क्रीडाज्योत १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी भारतात येणार असली तरी भारताच्या अव्वल खेळाडूंना ही क्रीडाज्योत घेऊन धावता येणार नाही. सुरक्षाव्यवस्थेमुळे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने हा सोहळा भव्यदिव्य न करण्याचे ठरवले आहे.
‘‘नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही क्रीडाज्योतीचे सन्मानपूर्व स्वागत करणार आहोत. मात्र ही क्रीडाज्योत घेऊन एकही धावपटू धावणार नाही. दसरा असल्यामुळे या कार्यक्रमासाठी सुरक्षा पुरवण्यास नकार मिळाला आहे. त्याचबरोबर ग्लास्गो येथील राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजकांनीही हा कार्यक्रम पुढे ढकलता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे,’’ असे आयओएचे प्रमुख विजय कुमार मल्होत्रा यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा