ICC Test Rankings: भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने ताज्या ICC कसोटी क्रमवारीत मोठी कामगिरी केली आहे. तो ११ स्थानांची मोठी झेप घेत ६३व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगल्या कामगिरीचा फायदा झाला असून बुधवारी जाहीर झालेल्या फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत तो नवव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे एकप्रकारे आयसीसी क्रमवारीत या दोन भारतीय फलंदाजांचा बोलबाला दिसून येत आहे.

२१ वर्षीय जैस्वालनेने पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध अनिर्णित राहिलेल्या दुसऱ्या कसोटीत ५७ आणि ३८ धावा केल्या. यामुळे त्याला आता ४६६ गुण मिळाले आहेत. दुसऱ्या कसोटीत ८० आणि ५७ धावा करणारा रोहित हा भारतीय कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याचे ७५९ गुण आहेत आणि तो श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेबरोबर नवव्या स्थानावर आहे.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

हेही वाचा: Pakistan Cricket Board: कुठे ते बीसीसीआय अन कुठे ते पीसीबी! मानधनावरून नवा गोंधळ, खेळाडूंचा स्वाक्षरी करण्यास नकार

कसोटी क्रमवारीत रोहितनंतर ऋषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे ७४३ गुण असून एका स्थानाच्या नुकसानासह तो १२व्या स्थानावर आहे. विराट कोहली ७३३ गुणांसह १४व्या स्थानावर कायम आहे. अ‍ॅशेसमध्ये चांगली कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन आणि इंग्लंडचा जो रूट यांनी प्रत्येकी तीन स्थानांनी प्रगती करत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन ८८३ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडचा जॅक क्रॉली १३ स्थानांनी ३५व्या, हॅरी ब्रूक ११व्या आणि जॉनी बेअरस्टो तीन स्थानांनी वाढून १९व्या स्थानावर आहे.

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (८७९) गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे, तर रवींद्र जडेजा (७८२) सहाव्या स्थानावर आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही क्रमवारीत प्रगती केली असून सहा स्थानांनी प्रगती करत ३३व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्याने गॅलेमध्ये सात विकेट्स घेत सात स्थानांनी प्रगती करत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जयसूर्याचा फिरकी जोडीदार रमेश मेंडिस या सामन्यात सहा विकेट्ससह एक स्थानाने पुढे २१व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा: PAK vs SL: १४६ वर्षात जे घडले नाही ते सौद शकीलने सात कसोटीत केले, गावसकरांसह ४ दिग्गजांना मागे टाकत केला विश्वविक्रम

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड तीन स्थानांनी प्रमोशन झाले असून तो २३व्या स्थानावर आहे. तसेच, ख्रिस वोक्स पाच स्थानांनी त्याचीही प्रगती झाली असून तो सध्या ३१व्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा लेगस्पिनर अबरार अहमद १२ स्थानांनी झेप घेत ४५व्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा डावखुरा फिरकी गोलंदाज जोमेल वॉरिकन सहा स्थानांनी पुढे जात ६२व्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजा आणि अश्विन यांनी आपले अव्वल दोन स्थान कायम राखले आहे, तर अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर कायम आहे.