चहर दुसऱ्या, तर श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) महालिलावात शनिवारी २० कोटी रुपयांच्या महाबोलीची अपेक्षा फोल ठरली. परंतु झारखंडचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन हा लिलावातील सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरला. १५ कोटी, २५ लाख रुपये रकमेला मुंबई इंडियन्स संघात त्याला स्थान दिले.

अष्टपैलू दीपक चहर (१४ कोटी) आणि धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी) यांनी महागडय़ा खेळाडूंच्या यादीत दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना संघात घेतले. सकाळच्या पहिल्या सत्रावर श्रेयसने लक्ष वेधले. मात्र लिलावाच्या दुसऱ्या सत्रात इशानला संघात कायम राखण्यासाठी मुंबईने सनरायजर्स हैदराबादशी कडवी लढत देत आकडा १५ कोटींपार उंचावला.

आकडय़ात चौथ्या क्रमांकावर चार खेळाडूंवर १० कोटी, ७५ लाख रुपयांची बोली लागली. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात सर्वाधिक बळी नावावर असणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने कायम ठेवले आहे. मात्र ‘आयसीसी’च्या गोलंदाजीच्या क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने आश्चर्यकारक मुसंडी मारली. बंगळूरु संघानेच हसरंगासाठीही पटेलइतकेच पैसे खर्च केले. गतहंगामात चेन्नईचे प्रतिनिधत्व करणाऱ्या अष्टपैलू शार्दूल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सने प्राप्त केले, तर निकोलस पूरनला सनरायजर्स हैदराबादने संघात स्थान दिले.

राजस्थान रॉयल्सने अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी ५ कोटी रुपये मोजले, तर डावखुऱ्या देवदत्त पडिक्कलला ७ कोटी, ७५ लाख रुपये बोलीसह प्राप्त केले. भारताच्या अनुभवी खेळाडूंपैकी सलामीवीर शिखर धवनसाठी पंजाब किंग्जने ८.२५ कोटी, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी गुजरात टायटन्सने ६.२५ कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्हो (४.४० कोटी), अंबाती रायुडू (६.७५ कोटी) आणि रॉबिन उथप्पा (२ कोटी) या खेळाडूंना कायम राखले.

परदेशी खेळाडूंपैकी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरला लखनऊ सुपरजायंट्सने ८.७५ कोटी, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला पंजाब किंग्जने ९.२५ कोटी, तर स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरला राजस्थान रॉयल्सने ८.५ कोटींपर्यंत बोली उंचावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सलामीवीर आणि कर्णधारपद हे दोन्ही प्रश्न सोडवण्याच्या इराद्यााने फॅफ डय़ूप्लेसिसला ७ कोटी रुपयांना संघात स्थान दिले, तर क्विंटन डीकॉकला (६.७५ कोटी) लखनऊने स्थान दिले.

लिलावकर्ता कोसळले

बंगळूरु : अनुभवी लिलावकर्ता ह्युज एडमिड्स शनिवारी लिलावाच्या पहिल्या दिवशी कमी रक्तदाबामुळे कोसळले. त्यांच्याऐवजी चारू शर्मा यांनी दिवसाच्या उर्वरित लिलावाचे संचालन केले. दुपारी दोनच्या सुमारास श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगावर संघमालक बोली लावत असताना एडमिड्स अचानक खाली पडले. त्यामुळे सर्वाची एकच धावपळ उडाली. लिलाव प्रक्रियासुद्धा यामुळे थांबवण्यात आली आणि ३.३० वाजता मग पुन्हा प्रक्रियेला प्रारंभ झाला. ६० वर्षीय एडमिड्स यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

शाहरुखची छाप

देशांतर्गत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी करणाऱ्या शाहरुख खानने नऊ कोटींच्या बोलीसह छाप पाडली. २० लाख रुपये मूळ किमतीसह तो लिलावात सहभागी झाला होता. पण पंजाब किंग्जने त्याच्यावर मोठी गुंतवणूक केली आहे. राजस्थानकडून हंगाम गाजवणाऱ्या राहुल तेवतियासाठी गुजरात टायटन्सने नऊ कोटींची बोली लावली.

कमिन्सचा भाव खालावला

२०२०च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने १५.५ कोटींच्या बोलीसह लक्ष वेधले होते. कोलकाता नाइट रायडर्सने कमिन्सला संघात कायम राखताना मात्र फक्त ७.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. कर्णधारपदाची क्षमता असलेला कमिन्स हंगामातील पहिल्या दोन आठवडय़ांत खेळू शकणार नाही.

कायम राखलेले खेळाडू (+१५ कोटी)

१७ कोटी – के. एल. राहुल (लखनऊ सुपरजायंट्स)

१६ कोटी – ऋषभ पंत

(दिल्ली कॅपिटल्स)

१६ कोटी – रोहित शर्मा

(मुंबई इंडियन्स)

१६ कोटी – रवींद्र जडेजा

(चेन्नई सुपर किंग्ज)

१५ कोटी – विराट कोहली

(रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु)

पुजारा, साहा, रहाणे,  इशांतचे भवितव्य आज

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा, उमेश यादव आणि इशांत शर्मा या अनुभवी कसोटी क्रिकेटपटूंना पहिल्या दिवशी लिलावात स्थान मिळाले नाही. परंतु रविवारी संघांनी उत्सुकता दर्शवली तरच या खेळाडूंचे भवितव्य ठरू शकेल. याशिवाय सुरेश रैना, डेव्हिड मिलर, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मॅथ्यू वेड, सॅम बििलग्स यांच्यावरही शनिवारी बोली लागली नाही.

मुंबई इंडियन्समध्ये परतल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. कौटुंबिक वातावरणामुळे माझे संघातील सर्वाशी ऋणानुबंधाचे नाते आहे. मी संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. – इशान किशन

Story img Loader