लखनऊ सुपर जायंट्सवर १२ धावांनी मात; ऋतुराज, मोईनची चमक

वृत्तसंस्था, चेन्नई

सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (३१ चेंडूंत ५७ धावा) अर्धशतकानंतर मोईन अलीच्या (२६ धावांत ४ बळी) प्रभावी माऱ्याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर १२ धावांनी विजय मिळवला चेन्नईने दिलेल्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या लखनऊनेही चांगला प्रारंभ केला. सलामीवीर काएल मेयर्सने (२२ चेंडूंत ५३ धावा) आक्रमक खेळी केली. कर्णधार केएल राहुल (२०) आणि मेयर्सने पहिल्या गडय़ासाठी ७९ धावांची भागिदारी रचली. मेयर्सला मोईन अलीने बाद केले. यानंतर दीपक हुडाच्या (२) रुपात संघाला दुसरा धक्का बसला. मग. राहुल, कृणाल पंडय़ा (९) आणि मार्कस स्टोइनिसला (२१) मोईनने बाद करत चेन्नईची अवस्था ५ बाद १३० अशी बिकट केली. निकोलस पूरनने (३२) काही आक्रमक फटके मारले. अखेरीस आयुष बदोनी (२३) आणि कृष्णप्पा गौतम (नाबाद १७) यांनी धावा केल्या. मात्र, त्यांची मेहनत अपुरी पडली.वूडने अखेरीस येऊन एक चौकार व एक षटकार मारले मात्र, संघाला त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे लखनऊला २० षटकांत ७ बाद २०५ धावा करता आल्या. चेन्नईकडून मोईनला तुषार देशपांडेची (२/४५) साथ मिळाली.

Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सामन्यात आक्रमक खेळी करणाऱ्या ऋतुराजने या सामन्यातही आपली ही लय कायम राखली. त्याला कॉन्वेचीही साथ मिळाली. दोघांनी पहिल्या गडय़ासाठी ११० धावांची भागिदारी रचली. ऋतुराजने आपल्या खेळीत ३ चौकार व ४ षटकार मारले. रवी बश्नोईने ऋतुराजला बाद करत ही भागिदारी मोडीत काढली. कॉन्वेही बाद झाल्यानंतर शिवम दुबे (२७), अंबाती रायुडू (नाबाद २७) आणि मोईन अली (१९) यांनी फटकेबाजी करत चेन्नईची धावसंख्या २० षटकांत ७ बाद २१७ पर्यंत पोहोचवली. लखनऊकडून बिश्नोई (३/२८) आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड (३/४९) यांनी चांगली गोलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ७ बाद २१७ (ऋतुराज गायकवाड ५७, डेव्हॉन कॉन्वे ४७, अंबाती रायुडू नाबाद २७; रवी बिश्नोई ३/२८, मार्क वूड ३/४९) विजयी वि. लखनऊ सुपर जायंट्स : २० षटकांत ७ बाद २०५ (काएल मेयर्स ५३, निकोलस पूरन ३२; मोईन अली ४/२६, तुषार देशपांडे २/४५)