चेन्नई : Indian Premier League Cricket पुन्हा तंदुरुस्त झालेला तारांकित अष्टपैलू बेन स्टोक्सच्या पुनरागमनामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाला बळकटी मिळणार असून शुक्रवारी ‘आयपीएल’च्या सामन्यात त्यांच्यापुढे सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाचेला झालेल्या दुखापतीमुळे स्टोक्सला गेल्या तीन सामन्यांना मुकावे लागले. परंतु बुधवारी त्याने काही काळ फलंदाजीचा सराव केला. त्यामुळे तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. चेन्नईच्या संघाने यंदा तीन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. मात्र, आता स्टोक्सच्या समावेशामुळे सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी मदत होईल अशी चेन्नई संघाला आशा असेल. 

चेन्नईच्या संघाने गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर मात केली होती. तर दुसरीकडे हैदराबादला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे चेन्नईचे सलग दुसऱ्या विजयाचे, तर हैदराबादचे विजयी पुनरागमनाचे लक्ष्य असेल.

  • वेळ : सायं. ७.३० वाजता
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian premier league cricket stokes comeback chennai vs sunrisers hyderabad challenge today ysh