आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या सहा पर्वामध्ये काही विशिष्ट खेळाडूंमुळे संघाला चेहरे प्राप्त झाले होते, हेच खेळाडू संघात नसतील तर बिनचेहऱ्याचे नवे संघ लिलावानंतर निर्माण होतील. या संघमालकांच्या भीतीवर मात करण्यासाठी आयपीएल प्रशासकीय समितीने एक जालीम ‘पंचकर्म’ चिकित्सा पद्धती राबवली आहे. यानुसार २०१४मध्ये होणाऱ्या आयपीएल लिलावाआधीच प्रत्येक फ्रेंचायझींना आपल्या संघातील पाच खेळाडूंना कायम ठेवण्याचा विशेषाधिकार देण्यात आला आहे. याचप्रमाणे याच विशेषाधिकाराने आपल्या संघातील काही खेळाडूंचा लिलाव थांबवून त्यांना संघात स्थान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
१२ फेब्रुवारीला होणाऱ्या या लिलावासाठीची नियमावली सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आली. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये खेळाडूंच्या करारासंदर्भातील नियम, संघरचना आणि लिलावाआधी खेळाडूंना संघात कायम ठेवण्याबाबतचे नियम ठरवण्यात आले. या लिलावाचे स्थळ नंतर घोषित करण्यात येणार आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. ‘
‘प्रत्येक फ्रेंचायझीला २०१३च्या खेळाडूंपैकी जास्तीतजास्त पाच जणांना संघात स्थान देता येईल. ते संघाकडून सामने खेळलेले असो किंवा नसो. यापैकी चारपेक्षा अधिक खेळाडू भारताकडून खेळलेले नसावेत,’’ असे बीसीसीआयने नमूद केले आहे.
आयपीएल प्रशासकीय समितीची ‘पंचकर्म’ चिकित्सा
आयपीएलच्या आतापर्यंत झालेल्या सहा पर्वामध्ये काही विशिष्ट खेळाडूंमुळे संघाला चेहरे प्राप्त झाले होते, हेच खेळाडू संघात नसतील तर बिनचेहऱ्याचे नवे संघ लिलावानंतर निर्माण होतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-12-2013 at 04:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian premier league ipl auctions on february 12 franchises can retain five players