पीटीआय, जयपूर

राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामाची दमदार सुरुवात केली असली, तरी सलामीवीर यशस्वी जैस्वालची निराशाजनक कामगिरी हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आज, बुधवारी गुजरात टायटन्सविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात जैस्वालला सूर गवसेल, अशी राजस्थानच्या संघाला आशा असेल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या वर्षी भारतीय संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जैस्वालला ‘आयपीएल’मध्ये मात्र धावांसाठी झगडावे लागले आहे. त्याला आतापर्यंतच्या चार सामन्यांत मिळून केवळ ३९ धावाच करता आल्या आहेत. गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध तो खातेही न उघडता बाद झाला. त्यामुळे आपल्या कामगिरीत सुधारणा करून गुजरातविरुद्ध मोठी खेळी करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.

हेही वाचा >>>जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत; क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेला सर्वात वयस्क टेनिसपटू

राजस्थानने आतापर्यंतचे चारही सामने जिंकले असून गुणतालिकेत ते आठ गुणांसह अग्रस्थानावर आहेत. आता गुजरातला नमवण्यात यश आल्यास राजस्थानचा संघ बाद फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकेल.

दुसरीकडे, गुजरातच्या संघाला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. आतापर्यंतच्या पाच सामन्यांत गुजरातने दोन विजय मिळवले असून तीनमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या दोन सामन्यांत त्यांना अनुक्रमे पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांनी पराभूत केले. त्यामुळे गुजरात संघाचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल. गुजरातचा तारांकित लेग-स्पिनर रशीद खानने कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>>जोकोविचकडून फेडररचा विक्रम मोडीत; क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेला सर्वात वयस्क टेनिसपटू

आघाडीचे फलंदाज लयीत…

जैस्वाल वगळता राजस्थानच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात यश आले आहे. विशेषत: कर्णधार संजू सॅमसन आता अधिक जबाबदारीने खेळताना दिसत आहे. त्याने चार सामन्यांत दोन अर्धशतकांच्या साहाय्याने १७८ धावा केल्या आहेत. जोस बटलरने गेल्या सामन्यात शतकी खेळी केली होती.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अॅप

Story img Loader