Indian shooters Sarabjot Singh Arjun Singh Cheema Shiv Narwal won fourth gold medal: आशियाई क्रीडा २०२३ च्या स्पर्धेत भारताला चौथे सुवर्णपदक मिळाले आहे. भारताने गुरुवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवसाची सुरुवात सुवर्ण पदकाने केली. भारताच्या पुरुष संघाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर दोन नेमबाजांनी वैयक्तिक अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताकडून सरबजोत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिवा नरवाल यांनी अंतिम फेरीत चीनचा पराभव करून अव्वल स्थान मिळविले.

भारतीय नेमबाजांनी सध्या सुरू असलेल्या खेळांमध्ये चार सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली आहेत. भारतीय त्रिकुटाने पात्रता फेरीत एकूण १७३४ गुण मिळवले, जे चीनच्या संघापेक्षा एक गुण जास्त आहे. चीनला रौप्य तर व्हिएतनामला (१७३०) कांस्यपदक मिळाले. सरबजोत आणि उर्जन यांनीही आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून ते अद्याप वैयक्तिक पदकाच्या शर्यतीत आहेत.

Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Smriti Mandhana World Record Most Runs in Calendar Year in Woman Cricket INDW vs WIW
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा विश्वविक्रम, २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिली महिला फलंदाज

नेमबाजीतील सांघिक स्पर्धेत भारताचे तिसरे सुवर्णपदक –

पात्रता फेरीत सरबजोतने ५८०, चीमाने ५७८ आणि नरवालने ५७६ गुण मिळवले. नेमबाजीतील सांघिक स्पर्धेत भारताचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी, भारताने १० मीटर एअर रायफल आणि महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे. २२ वर्षीय सरबजोतने पात्रता फेरीत पाचव्या स्थानावर राहून वैयक्तिक अंतिम फेरीत प्रवेश केला. सरबजोतने यावर्षी भोपाळ येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत वरिष्ठ स्तरावर पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. चीमानेही आठवे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली. पात्रतेमध्ये सरबजोतची मालिका ९७, ९६, ९७, ९७, ९६ आणि ९५ होती, तर चीमाची मालिका ९७, ९६, ९७, ९७, ९६ आणि ९५ अशी होती. पात्रतामध्ये १४व्या स्थानावर राहिलेल्या नरवालची मालिका ९२, ९६, ९७, ९९, ९७ आणि ९५ अशी होती.

रोशिबिना देवी इतिहास रचण्यास मुकली –

मात्र, याआधी भारतीय वुशू खेळाडू रोशिबिना देवी इतिहास रचण्यास मुकली. वास्तविक, रोशीबिना देवीला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, परंतु अंतिम सामन्यात ती हरली. चीनच्या खेळाडूने महिलांच्या ६० किलो गटात रोशिबिना देवीला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. रोशीबिना देवी आज फायनल जिंकण्यात यशस्वी ठरली असती, तर तिने इतिहास रचला असता. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला वुशूमध्ये कधीही सुवर्णपदक जिंकता आले नाही. रोशिबिना देवीला सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती, पण ती हुकली.

Story img Loader