कर्नाटकच्या तान्या हेमंतने रविवारी तेहरान येथे इराण फजर आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले, परंतु तिला सुवर्णपदक मिळवण्यापूर्वी हिजाब घालावा लागला. हिजाब घातल्याशिवाय सुवर्णपदक देता येणार नसल्याचे सांगितल्याने तिला देखील ते मान्य करावे लागले. प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय द्वितीय मानांकित तान्याने ३० मिनिटांत गतविजेती आणि देशबांधव तस्नीम मीरला गारद केले. पहिल्या गेममध्ये या बंगळूरच्या मुलीने २१-७,२१-११ असा विजय नोंदवला.

कार्यक्रमाच्या ठरलेल्या नियमानुसार आयोजकांनी तान्याला पदकप्रदान समारंभात हिजाब घालण्यास सांगितले. तस्नीमने हा मुकुट जिंकल्यावर गेल्या वर्षीही ही प्रथा प्रचलित होती. बॅडमिंटनच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार आयोजकांनी हे स्पष्ट केले आहे की जरी टूर्नामेंट प्रॉस्पेक्टसमध्ये पोडियम ड्रेस कोडचा उल्लेख नाही तरी महिला पदक विजेत्यांसाठी हिसाब अनिवार्य आहे. सूत्रांच्या मते, “प्रॉस्पेक्टस बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या स्पर्धा नियमांमधील कपड्याच्या नियमांबद्दल बोलले होते, जे बहुतेक जगभरातील स्पर्धांमध्ये सामान्य आहे. तेहरानमध्ये महिलांनी बाहेर पडताना हिजाब अनिवार्य आहे हे आम्हाला माहीत होते, परंतु स्पर्धेदरम्यान त्यांच्या वापराबाबत कोणताही विशेष उल्लेख नव्हता.”

हेही वाचा: BCCI vs PCB Asia Cup 2023: “नहीं आएं तो भाड़ में जाएं…” आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत जावेद मियाँदादने ओकली गरळ

महिला शटलर्सना त्यांच्या सामन्यांदरम्यान लेगिंग किंवा हिजाब अशा कोणत्याही निर्बंधांचा सामना करावा लागला नाही. परंतु कोणत्याही पुरुष प्रेक्षकांना त्यांना खेळताना पाहण्याची परवानगी नव्हती. प्रवेशद्वारावर ‘पुरुषांना परवानगी नाही’ असे लिहिलेले स्टिकर, महिला खेळाडूचे प्रशिक्षक किंवा तिचे पालक यांच्यात भेदभाव करत नाही. दोघांनाही पुरुष असल्यास स्टेडियममध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. योगायोगाने, दुहेरीत एका जोडीसह १३ भारतीय महिला शटलर्स रिंगणात होत्या.

हेही वाचा: IND vs AUS: अक्षर की कुलदीप, कोणाला मिळणार संधी! माजी निवडकर्त्याने केलेल्या निवडीशी तुम्ही आहात का सहमत?

विशेष म्हणजे, स्पर्धेत प्रथमच त्यांच्या मेनूमध्ये मिश्र दुहेरीचा समावेश होता, ज्यामध्ये जगभरातील १० जोड्या सहभागी झाल्या होत्या. या बाबत सूत्र सांगतात, “महिलांचे वेळापत्रक सकाळी आणि पुरुषांचे दुपारी असे. महिलांचे सामने पाहण्यासाठी फक्त महिला प्रेक्षकांना परवानगी होती. तसेच, महिलांच्या सामन्यांमध्ये सामना अधिकारी सर्व महिला होत्या. या संमेलनात आपल्या मुलींसोबत आलेल्या पुरुष पालकांना एकही सामना पाहायला मिळाला नाही. केवळ मिश्र दुहेरीच्या वेळीच पुरुष आणि महिला खेळाडू कोर्टवर एकत्र दिसले.”

Story img Loader