Asian Snooker Tour : भारताचा स्नूकरपटू पंकज अडवाणी याने चीन येथे सुरु असलेल्या Asian Snooker Tour स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पंकज अडवाणीने आपला प्रतिस्पर्धी चीनचा जु रेती याला ६-१ <४८-३५, ६७(४०) – २३, २४-६९(६०), ६३-३३, १००(४९,५१)-०,४७-१९,९४(९४)-०> असे पराभूत केले. या बरोबरच Asian Snooker Tour स्पर्धेत हे भारताचे पहिले विजेतेपद ठरले. हि स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही स्पर्धा नव्या १०-रेड पद्धतीने खेळली गेली होती. सर्व स्पर्धकांनी ही पद्धत लवकर आत्मसात केली. पंकजने या स्पर्धेतील साखळी सामने आणि बाद फेरीचे सामने असे सर्व सामने एकतर्फी जिंकले.

भारताच्या पंकजने पहिला सेट ४८-३५ ने जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये त्याने ६७(४०)-२३ असा विजय मिळवला. तिसऱ्या सेटमध्ये चीनच्या स्पर्धकाने पुनरागमन केले आणि सेट ६९(६०)-२४ असा जिंकला. पण त्यानंतर उरलेले सेट पंकजने ६३-३३, १००(४९,५१)-०, ४७-१९, ९४(९४)-० एकतर्फी जिंकले आणि Asian Snooker Tour जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू करण्याचा मान मिळवला.