सध्या सुरू असलेला दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यात भारतीय संघ एक कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी एका भारतीय खेळाडूने आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. या खेळाडूने इंग्लंड दौऱ्याची तयारी म्हणून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात नावाजलेल्या भारतीय खेळाडूने पुन्हा क्लब क्रिकेट खेळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. रविचंद्रन अश्विन असे या खेळाडूचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम काही दिवसांपूर्वीच संपला. त्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात दाखल झाला. या मालिकेतून काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्वीन या खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी विराट कोहली सध्या घरीच आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे तर, रोहित शर्मा नुकताच मालदीव फिरून आला आहे. रविचंद्रन अश्वीनने मात्र, जरा हटके पर्याय निवडला. त्याने विश्रांतीसाठी मिळालेल्या वेळेत क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याने एका क्लबचे कर्णधारपदही स्वीकारले.

हेही वाचा – ENG vs NZ: न्यूझीलंडच्या संघाने अनोख्या पद्धतीने केली आपल्या फलंदाजाच्या कृतीची भरपाई

अश्विनने पलायमपट्टी शिल्ड स्पर्धेत भाग घेतला होता. यादरम्यान त्याने ‘मैलापूर रिक्रिएशन क्लब ए’चे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात संघाने उपांत्य आणि अंतिम सामने खेळत विजय मिळवले. उपांत्य फेरीत अश्विनने १०८ चेंडूत ८१ धावांची शानदार खेळी केली.

जेतेपद पटकावल्यानंतर अश्विनने क्लब क्रिकेट खेळण्यामागचे कारण स्पष्ट केले. तो म्हणाला, “आयपीएलच्या मूडमधून बाहेर पडण्यासाठी मी क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. वाढते वय आणि अनुभवानुसार तुम्ही अधिक चांगला खेळ करू शकता. मी देखील तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. मी सध्या खेळाचा आनंद घेत आहे आणि मला इंग्लंडमध्येही असेच करायचे आहे. मी तिथेही गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये योगदान देऊ शकतो.”