आयसीसी अंडर-१९ महिला विश्वचषक स्पर्धेला १४ जानेवारीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी,अखिल भारतीय महिला निवड समितीने भारतीय अंडर-१९ महिला संघ निडला आहे. या संघाचे नेतृत्व वरिष्ठ संघाची सलामीवीर शेफाली वर्मा करणार आहे. त्याचबरोबर शेफाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत देखील नेतृत्व करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक ही पहिली आवृत्ती आहे, ज्यामध्ये १६ संघ सहभागी होतील. ही स्पर्धा १४ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाणार आहे. भारताला ड गटात दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडसह स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील, जिथे संघांना सहा जणांच्या दोन गटात ठेवण्यात येईल.

प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. जे 27 जानेवारी रोजी पॉचेफस्ट्रूम येथील जेबी मार्क्स ओव्हल येथे खेळले जातील. या मैदानावर २९ जानेवारीला अंतिम सामना होणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी महिला भारतीय संघ –

हेही वाचा – ‘तुम्हाला, मी मरावे असे का वाटते?’ पाकिस्तानी पत्रकारावर भडकला नसीम शाह, पाहा व्हिडिओ

शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहडिया, हर्ले गाला, ऋषिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, तीस्ता साधू, फलक नाज आणि शबनम एमडी.

राखीव खेळाडू: शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian squad announced for icc u19 womens world cup 2023 shefali verma will lead the team vbm