अखिल भारतीय महिला निवड समितीने (ACC) महिला टी२० आशिया चषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशातील सिल्हेट येथे होणाऱ्या या स्पर्धेत हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे. शेफाली वर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, राधा यादव आणि केपी नवगैरे या खेळाडू पहिल्यांदाच महिला आशिया चषक खेळणार आहेत. तान्या भाटिया, सिमरन दिल बहादूर यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी महिला आशिया चषक २०२२ च्या आठव्या आवृत्तीचे वेळापत्रक जाहीर केले. १ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होणार हे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि बांगलादेशचे संघ सहभागी होणार आहेत.

हेही वाचा :  Women’s T20 Asia Cup: पुन्हा एकदा भारत–पकिस्तान आमनेसामने, आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर 

बांगलादेश या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे आणि हे सामने सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. भारत आपल्या मोहिमेची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध करेल आणि १ ऑक्टोबर रोजी सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ग्राउंड २ वर दुपारी १.३० वाजता पहिला सामना खेळेल. भारत राऊंड रॉबिन प्रकारात एकूण सहा सामने खेळणार आहे. यानंतर उपांत्य फेरीचे सामने होतील. स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी भारताचे प्रयत्न अपेक्षित असतील.

हेही वाचा :  INDW Vs EngW: हरमनप्रीत कौरच्या धडाकेबाज शतकी खेळीने इंग्लंडला चारली धूळ, तब्बल २३ वर्षांनी इंग्लंडमध्ये मालिका विजय

जय शाह म्हणाले की, “आशिया चषक स्पर्धेत प्रथमच सात संघ सहभागी होत आहेत.” पुढे ते म्हणाले, “इतिहासात प्रथमच ७ महिला संघ राउंड रॉबिन प्रकारामध्ये सहभागी होत आहेत, यामुळे आशियातील सहयोगी संघांचा विकास होण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेत फक्त महिलाच सहभागी होतील. पंचांपासून ते अधिकृतपर्यंत फक्त महिलाच सहभागी होतील.

महिला आशिया चषक भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, सबीनीन मेघना, रिचा घोष (डब्ल्यूके), पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, केपी नवगिरे.

राखीव खेळाडू

तान्या, सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर.

Story img Loader