इंच्योन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या १० जणांच्या टेबल टेनिस संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारी तसेच सध्याचा फॉर्म ध्यानात घेऊनच हा संघ निवडण्यात आला आहे. पुरुषांमध्ये शरद कमालकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले असून या संघात सौम्यजित घोष, हरमीत देसाई, अँटोनी अमलराज आणि सनील शेट्टीचा समावेश आहे. महिला संघात अंकिता दास, मधुरिका पाटकर, पौलमी घटक यांच्यासह मानिका बात्रा आणि नेहा अगरवाल यांच्यावर भारताची भिस्त असणार आहे.
भारतीय टेबल टेनिस महासंघाने खेळाडूंची यादी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे (आयओए) पाठवली असून आयओए ती यादी अंतिम मंजुरीसाठी क्रीडा मंत्रालयाकडे पाठवणार आहे.
भारताच्या टेबल टेनिस संघाची घोषणा
इंच्योन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या १० जणांच्या टेबल टेनिस संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
First published on: 13-09-2014 at 01:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian table tennis team announced for asian games