इंच्योन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या १० जणांच्या टेबल टेनिस संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारी तसेच सध्याचा फॉर्म ध्यानात घेऊनच हा संघ निवडण्यात आला आहे. पुरुषांमध्ये शरद कमालकडे भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले असून या संघात सौम्यजित घोष, हरमीत देसाई, अँटोनी अमलराज आणि सनील शेट्टीचा समावेश आहे. महिला संघात अंकिता दास, मधुरिका पाटकर, पौलमी घटक यांच्यासह मानिका बात्रा आणि नेहा अगरवाल यांच्यावर भारताची भिस्त असणार आहे.
भारतीय टेबल टेनिस महासंघाने खेळाडूंची यादी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे (आयओए) पाठवली असून आयओए ती यादी अंतिम मंजुरीसाठी क्रीडा मंत्रालयाकडे पाठवणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा