U-19 Men’s World Cup 2024, Team India: पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा १९ जानेवारीपासून सुरू होणार असून ११ फेब्रुवारीला विजेतेपदाचा सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत त्रिकोणीय शृंखला खेळणार आहे. जे खेळाडू विश्वचषकात खेळतील तेच खेळाडू त्या मालिकेतही सहभागी होतील. पंजाबच्या उदय सहारनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आशिया चषक स्पर्धेतही तो संघाचे नेतृत्व करत आहे.

बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समितीने दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिका आणि आगामी आयसीसी पुरुष अंडर-१९ विश्वचषक २०२४ साठी भारताच्या अंडर-१९ पुरुष संघाची घोषणा केली आहे. भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील त्रिकोणीय मालिकेला २९ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघ पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० जानेवारीला, दुसरा सामना २५ जानेवारीला आयर्लंडशी आणि तिसरा सामना २८ जानेवारीला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. हे सर्व सामने येथील पाच मैदानांवर खेळवले जातील.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
Former Mahayutti MLAs in Solapur compete for seat among five Legislative Council appointees
विधान परिषदेसाठी सोलापुरात, महायुतीच्या माजी आमदारांमध्ये स्पर्धा

आयसीसीने सोमवारी संध्याकाळी अंडर-१९ विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यावेळी विश्वचषकात चार गट करण्यात आले आहेत. चारही गटात प्रत्येकी चार संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. चारही गटांतील अव्वल ३ संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. म्हणजेच दुसऱ्या फेरीत एकूण १२ संघ असतील. येथे प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील दोन संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच या फेरीत प्रत्येक संघाचे दोन सामने होतील. यानंतर सर्वोतम-४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. सेमीफायनल आणि फायनलसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

भारत हा अंडर-१९ विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे

१९८८ पासून अंडर-१९ वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे. हे १९९८ पासून दर दुसऱ्या वर्षी आयोजित केले जाते. भारतीय संघ हा अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. याशिवाय २०१६ आणि २०२० मध्ये भारत उपविजेता ठरला आहे.

अ गट : भारत, बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका

ब गट: इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड

क गट: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया

ड गट : अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ

हेही वाचा: आगामी टी-२० विश्वचषकासाठी इरफान पठाणची इशान किशन ऐवजी ‘या’ खेळाडूला पहिली पसंती; म्हणाला, “फिरकीसमोर…”

अंडर-१९ विश्वचषकासाठी भारतीय संघ

अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी

Story img Loader