झिम्बाब्वेमध्ये २४ जुलैपासून सुरू होणाऱया पाच एकदिवसीय सामन्यांसाठी आज रविवार भारतीय संघ झिम्बाब्वेसाठी रवाना झाला. मुख्यम्हणजे या मालिकेत भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहली सांभाळणार आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थित भारतीय संघ परदेशात खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ प्रथमच परदेशात मालिका खेळणार आहे.
भारतीय संघाच्या निवड समितीने धोनी बरोबर ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, आर. अश्निन आणि उमेश यादव यांनाही विश्रांती दिली आहे.
भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, दिनेश कार्तिक, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, परवेझ रसूल, मोहम्मद शमी, विनय कुमार, जयदेव उनाडकत, मोहित शर्मा
एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
* २४ जुलै- पहिला एकदिवसीय सामना(हरारे)
* २६ जुलै- दुसरा एकदिवसीय सामना (हरारे)
* २८ जुलै-तिसरा एकदिवसीय सामना(हरारे)
* ३१ जुलै-चौथा एकदिवसीय सामना(बुलवायो)
* ३ ऑगस्ट- पाचवा एकदिवसीय सामना (बुलावायो)