Indian Team ICC Rankings: टीम इंडियाच्या नावावर एक ऐतिहासिक सुपर विक्रम जमा झाला आहे. वास्तविक, भारतीय क्रिकेट संघाने अशी अद्भुत कामगिरी करून इतिहास रचला आहे. हा विक्रम गाठणे आतापर्यंत ऑस्ट्रेलियालाही जमलेले नाही. भारतीय क्रिकेट संघाने नवा इतिहास रचला असून अशी कामगिरी करणारा भारत हा दुसराच देश आहे. ICCने नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे, त्यानुसार भारत आता जगातील नंबर १ कसोटी संघ आहे. नागपूर कसोटीतील विजयानंतर भारताचे आता ११५ गुण झाले असून ऑस्ट्रेलियाचा संघ १११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
टीम इंडियाचा ऐतिहासिक ‘महाविक्रम’
यासह, भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट, कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर १ संघ बनला आहे. टीम इंडिया सध्या कसोटी, एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जगातील नंबर १ संघ आहे. भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदाच ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
२०२३ मध्ये एकदिवसीय आणि कसोटीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला
२०२३ पूर्वी भारतीय संघ टी२० इंटरनॅशनलमध्ये फक्त नंबर वन टीम होता. पण या वर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाने वन डे आणि कसोटीमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मायदेशात खेळल्या गेलेल्या वन डे मालिकेत भारताने न्यूझीलंडचा ३-० असा धुव्वा उडवला आणि एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर होता. भारताच्या मालिका विजयाने हा आकडा उलटला.
याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव करून मोठा विजय नोंदवला. या विजयानंतर टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक मिळाला आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर तर भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र भारताच्या विजयाने हा आकडा उलटला. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही शतक झळकावून आयसीसी क्रमवारीत सुधारणा केली. आता रोहित शर्मा कसोटी क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आला आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा दबदबा
सध्या टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय या तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय संघातील काही खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीतही कब्जा केला आहे. यामध्ये टीममध्ये नंबर १ टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाज, नंबर १ वनडे गोलंदाज, नंबर १ कसोटी अष्टपैलू, नंबर २ कसोटी अष्टपैलू आणि नंबर २ कसोटी गोलंदाज आहेत.
कसोटीत नंबर वन टीम इंडिया.
एकदिवसीय मध्ये नंबर वन टीम इंडिया.
टी२० आंतरराष्ट्रीय मधील नंबर १ टीम इंडिया.
सूर्यकुमार यादव – नंबर १ टी२० आंतरराष्ट्रीय फलंदाज.
मोहम्मद सिराज – नंबर १ एकदिवसीय गोलंदाज.
रवींद्र जडेजा – नंबर १ कसोटी अष्टपैलू खेळाडू.
रविचंद्रन अश्विन – नंबर २ कसोटी गोलंदाज.
रविचंद्रन अश्विन – नंबर २ कसोटी अष्टपैलू खेळाडू.
टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये नंबर १ कधी बनली होती?
भारतीय संघ १९७३ मध्ये प्रथमच कसोटी क्रमवारीत नंबर-१ बनला होता, त्यानंतर टीम इंडियाला बरीच प्रतीक्षा करावी लागली. २००९ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर-१ बनली होती, ती २०११ पर्यंत त्याच स्थानावर होती. त्यानंतर, २०१६ मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटीत अव्वल स्थान गाठले आणि एप्रिल २०२० पर्यंत सातत्याने पहिल्या क्रमांकावर होते. तेव्हापासून टीम इंडिया सर्वोत्तम-३ मध्ये होती, मात्र आता पुन्हा एकदा ती नंबर-१ वर पोहोचली आहे.