Indian Team News ODI Jersey: भारतीय संघ वनडे सामने खेळताना एका नव्या रूपात दिसणार आहे. BCCI ने भारतीय संघाची वनडे सामन्यांसाठी नवीन जर्सी लाँच केली आहे. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत सिंग या नवीन जर्सीच्या लाँचिंगवेळी उपस्थित होते. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुंबईतील बोर्डाच्या कार्यालयात संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. टीम इंडियाची ही जर्सी प्रसिद्ध जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी Adidas ने बनवली आहे.

टीम इंडियाची पूर्वीची जर्सी पूर्णपणे निळ्या रंगाची होती आणि तिच्या खांद्यावर तीन Adidas च्या लोगोचे पट्टे होते. विश्वचषकादरम्यान ते पट्टे तिरंग्याच्या रंगाचे आहेत. यावेळी देखील खांद्यावर आदिदासचे प्रसिद्ध तीन पट्टे आहेत, ज्याचा रंग पांढरा होता, पण यावेळी खांद्यावर तिरंग्याचा रंग आहे, ज्यावर हे पट्टे लावण्यात आले आहेत. या जर्सीचा निळा रंग आधीच्या जर्सीपेक्षा किंचित हलका आहे पण त्याच्या बाजूने गडद रंग देण्यात आला आहे.

हेही वाचा – VIDEO: क्रिकेट विश्वात पसरली शोककळा, महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना

केवळ महिला संघच नाही तर पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माही ही जर्सी परिधान करताना दिसणार आहे. भारतीय पुरूष संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तर आता महिला संघ ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका ५ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे.

हेही वाचा – Glenn Phillips Flying Catch: क्रिकेटमधील सर्वाेत्कृष्ट झेल? ‘सुपरमॅन’ फिलीप्सने हवेत झेप घेत टिपला अनपेक्षित कॅच, VIDEO व्हायरल

या मालिकेत भारतीय संघ घालणार नवी जर्सी?

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सध्या भारत मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दुसरा सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. भारतीय संघ नवीन जर्सी घालून या मालिकेत खेळताना दिसणार आहे. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत ही जर्सी घालून खेळताना दिसेल.

हेही वाचा – VIDEO: बापरे! फाफ डू प्लेसिस बॉल बॉयवरून गोलांटी उडी खात पडला मैदानाबाहेर, लाईव्ह सामन्यात घडली मोठी घटना