India recorded a very embarrassing record losing 6 wickets : केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ २४व्या षटकात बाद झाला. त्यानंतर ३५व्या षटकात भारतीय संघही गडगडला. यजमान दक्षिण आफ्रिकेने केवळ ५५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १५३ धावांवरच मर्यादित राहिला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. पण विशेष बाब म्हणजे केवळ ५९ षटकांच्या खेळात २० विकेट्स पडल्या. भारताने आपल्या शेवटच्या ६ विकेट्स केवळ ० धावांवर गमावल्या. ज्यामुळे भारतीय संघाच्या नावावर एका अतिशय लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
टीम इंडियाने अवघ्या ११ चेंडूत गमावल्या ६ विकेट्स –
भारतीय संघाची धावसंख्या ३३ षटकापर्यंत ४ बाद १५३ धावा होती. विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर होते. भारतीय संघ किमान २५० धावा करेल अशी अपेक्षा होती. पण इथून पुढे जे घडले त्यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. भारतीय संघाची धावसंख्या १५३ च्या पुढे जाऊ शकली नाही आणि संपूर्ण संघ त्याच धावसंख्येवर गडगडला. टीम इंडियाने शेवटच्या ६ विकेट्स अवघ्या ११ चेंडूंवर गमावल्या.
भारताच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद –
अशा प्रकारे भारताने ९८ धावांची आघाडी घेतली. त्याचबरोबर दोन्ही संघांचा पहिला डाव संपला तेव्हा ६० षटकेही झाली नव्हती. काही तासांतच भारतीय गोलंदाज पुन्हा एकदा मैदानात उतरले. लुंगी एनगिडीने ३४व्या षटकात तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर रबाडाच्या ३४व्या षटकात अवघ्या पाच चेंडूत तीन विकेट पडल्या. अशाप्रकारे भारतीय संघाचा डाव काही वेळातच कोसळला. विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावांचे योगदान दिले. टीम इंडिया १५३ धावांवर गारद झाली. मात्र, या संघाचे शेवटचे सहा फलंदाज या धावसंख्येवर एकही धाव न जोडता बाद झाले. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका संघाच्या ६ विकेट्स एकही धाव न काढता पडल्या आहेत.
कसोटीतील एका डावात एकाच विशिष्ट धावसंख्येवर पडल्या सर्वाधिक विकेट्स –
६ (१५३/४ ते १५३ सर्वबाद) – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन २०२४
५ (३७/२ ते ३७/७) – न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया, वेलिंग्टन, १९४६
५ (५९/४ ते ५९/९) – न्यूझीलंड वि. पाक, रावळपिंडी सीसी, १९६५
५ (१३३/२ ते १३३/७) – न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका, हॅमिल्टन, २०१२
५ (१३४/५ ते १३४ सर्वबाद) – बांगलादेश वि. झिम्बाब्वे, हरारे, २०१३
कसोटी इतिहासात दुसऱ्यांदा भारताचे सहा फलंदाज शून्यावर बाद झाले –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा असे घडले की एका डावात ६ भारतीय फलंदाज शून्यावर बाद झाले. टीम इंडियाने यापूर्वी २०१४ मध्ये मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एका डावात आपले सहा फलंदाज शून्यावर गमावले होते. आता त्यानंतर १० वर्षांनंतर पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतासोबत असे घडले. तसे, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आठव्यांदा असे घडले जेव्हा एका डावात ६ फलंदाज शून्यावर बाद झाले.
कसोटी सामन्यातील एका डावात शून्यावर सर्वाधिक खेळाडू बाद होण्याचा विक्रम –
६ – पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, कराची, १९८०
६ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, अहमदाबाद, १९९६
६ – बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका, २००२
६ – भारत विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, २०१४
६ – न्यूझीलंड विरुद्ध पाक, दुबई , २०१८
६ – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, मीरपूर, २०२२
६ – बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड, २०२२
६– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, २०२४