Indian team took a lead of 143 runs in 1st Inning : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आणि यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे पहिल्या डावात ३९६ धावा केल्या. यानंतर जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला २५३ धावांवर रोखले. त्यामुळे भारताने पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळवली. जसप्रीत बुमराहने सहा विकेट घेतल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनला बाद करून इंग्लंडचा डाव संपवला. या सामन्यातील त्याची ही सहावी विकेट ठरली. त्याच्याशिवाय कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक ७६ धावा केल्या. त्याच्याशिवाय इंग्लंडकडून इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. ४७ धावा करणारा बेन स्टोक्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला –

भारत आणि इंग्लंड यांच्यातील विशाखापट्टणम कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात बिनबाद २८ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल १५ आणि कर्णधार रोहित शर्मा १३ धावांवर नाबाद आहेत. तत्पूर्वी, इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावांत गारद झाला होता. भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळाली. आता ही आघाडी दुसऱ्या दिवसअखेर १७१ धावांची झाली आहे.

हेही वाचा – IND vs ENG : “मला अजूनही आश्चर्य वाटते की…”, दुसऱ्या कसोटीतील खेळपट्टी पाहून सौरव गांगुलीने उपस्थित केला प्रश्न

भारताच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचे, तर २२ वर्षीय यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावून भारताला या कसोटीत इंग्लंडपेक्षा पुढे केले. यशस्वीने २९० चेंडूत २०९ धावा करत अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले. यशस्वीच्या खेळीमुळेच भारताला ३९६ धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. कारण यशस्वीची खेळी नसती, तर कदाचित भारत ३०० धावांपर्यंत पोहोचू शकला नसता. कारण त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही झळकावता आले नाही. इंग्लंडकडून जिमी अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी ३-३ बळी घेतले. हैदराबाद कसोटीचा नायक टॉम हार्टलीला एक यश मिळाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian team restricted england to 253 runs in the first innings and took a lead of 143 runs in 2nd test match vbm