देवेंद्र पांडे

Indian Squad For T20 Series Against England : भारत आणि इंग्लंड यांच्या येत्या २२ जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून, यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षभरापासून घोट्याच्या दुखापतीमुळे शमी भारतीय संघाबाहेर होता. तो भारतासाठी शेवटचे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला संधी मिळेल अशी आशा होती. मात्र बीसीसीआयने एका निवेदनाद्वारे शमी दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान दिले नसल्याचे स्पष्ट केले होते.

निवड समितीने संघात यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला पहिली पसंती दिली आहे. तर, दुसरा यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड केली आहे. असे असले तरी निवड समितीने ऋषभ पंत आणि जितेश शर्मा यांच्या जागी जुरेलला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत छाप सोडणाऱ्या अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला देखील या टी-२० संघात स्थान दिले आहे.

हे ही वाचा : Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल

दरम्यान मागच्या टी-२० मालिकेत भारतीय संघात असलेल्या अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग आणि शिवम दुबेला यांना वगळण्यात आले असून, त्यांच्य जागी अनुक्रमे यशस्वी जैयस्वाल, नितीश कुमार आणि नितीश कुमार रेड्डी यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, दुखापतीमुळे मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग या टी-२० मालिकेला मुकणार आहे.

हे ही वाचा : Wankhede Stadium : धोनीचा विश्वविजयी षटकार ते फ्लिनटॉफचं शर्टलेस सेलिब्रेशन, ‘हे’ आहेत वानखेडे स्टेडियमवरील पाच रोमांचक सामने

इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या या १५ सदस्सीय संघात सहा फलंदाज, सात गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे होणार आहेत.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर.

Story img Loader