देवेंद्र पांडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Indian Squad For T20 Series Against England : भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या २२ जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली असून, यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षभरापासून घोट्याच्या दुखापतीमुळे शमी भारतीय संघाबाहेर होता. तो भारतासाठी शेवटचे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता.

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला संधी मिळेल अशी आशा होती. मात्र बीसीसीआयने एका निवेदनाद्वारे शमी दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान दिले नसल्याचे स्पष्ट केले होते.

निवड समितीने संघात यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला पहिली पसंती दिली आहे. तर, दुसरा यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड केली आहे. असे असले तरी निवड समितीने ऋषभ पंत आणि जितेश शर्मा यांच्या जागी जुरेलला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत छाप सोडणाऱ्या अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला देखील या टी-२० संघात स्थान दिले आहे.

हे ही वाचा : Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल

दरम्यान मागच्या टी-२० मालिकेत भारतीय संघात असलेल्या अभिषेक शर्मा, रमणदीप सिंग आणि शिवम दुबेला यांना वगळण्यात आले असून, त्यांच्य जागी अनुक्रमे यशस्वी जैयस्वाल, नितीश कुमार आणि नितीश कुमार रेड्डी यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, दुखापतीमुळे मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग या टी-२० मालिकेला मुकणार आहे.

हे ही वाचा : Wankhede Stadium : धोनीचा विश्वविजयी षटकार ते फ्लिनटॉफचं शर्टलेस सेलिब्रेशन, ‘हे’ आहेत वानखेडे स्टेडियमवरील पाच रोमांचक सामने

इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या या १५ सदस्सीय संघात सहा फलंदाज, सात गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. या मालिकेतील सामने अनुक्रमे कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे होणार आहेत.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian team selected for t20 series against england mohammed shami returns after a year aam