हैदराबादमध्ये अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ विजयाच्या निश्चयाने उतरणार असून मालिका २-१ अशी जिंकण्याचा रोहित ब्रिगेडचा प्रयत्न असेल. मोहालीत पराभूत झाल्यानंतर नागपूरमधील दुसऱ्या टी२० लढतीत ६ गडी राखून विजय साकारल्यानंतर आता टीम इंडिया विश्वकरंडकाआधी मालिका विजयाला गवसणी घालून आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. अर्थात भारतीय संघाला यानंतर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करावयाचे आहेत; पण त्याआधी हर्षल पटेल व युझवेंद्र चहलचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय असणार आहे.

नागपूरात विजयाची नोंद करून भारताने मालिकेत बरोबरी साधली असेल, पण हर्षल आणि चहलचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. या दोघांना टी२० विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये परतताना भारतीय संघाला पाहायचे आहे. जसप्रीत बुमराहचे पुनरागमन ही भारतासाठी सर्वात आनंदाची बातमी आहे, पण वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा खराब फॉर्मदेखील चिंतेचा विषय आहे. भुवनेश्वरला दुसऱ्या टी२० सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. तर हार्दिक पंड्या याने अष्टपैलूची भूमिका पार पाडली. रोहित शर्मा महत्वाच्या सामन्यात कोणतीही जोखीम नाही घेऊ शकत. यामुळे तो हार्दिक आणि आणखी पाच गोलंदाज यांना संघात घेण्याची शक्यता आहे. जर एका अधिक गोलंदाजाला संघात घेतले तर रिषभ पंत याचे संघाबाहेर होणे निश्चित आहे.

हेही वाचा  : भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका :  मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य!; आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात हर्षल, चहलवर नजर

भारत आणि ऑस्ट्रेलियातील सामना रविवारी म्हणजे आज होत आहे आणि अंदाजानुसार रविवारी (दि.२५) पाऊस पडणार नसल्याचे हवामान अंदाजात वर्तवले आहे. पण पाऊस हा साधारण दुपारी पडणार असल्याचे सांगितले जात आहे. पण हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत मैदान सुकवता येऊ शकते. सामना सुरु असताना एखाद-दुसऱ्या पावसाच्या हलक्या सरी येऊ शकतात. पण त्यामुळे सामन्यामध्ये जास्त बाधा येणार नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यात जो संघ नाणेफेक जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी स्विकारेल आणि धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देईल. कारण धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला किती षटकांमध्ये किती धावा करायच्या आहेत, हे समजू शकते. त्यामुळे कोणताही संघ धावांचा पाठलाग करायला जास्त प्राधान्य देऊ शकतो.

हेही वाचा  : IND vs AUS Video: इथे ऑस्ट्रेलियाला हरवलं अन तिथे चाहते ओरडले RCB.. RCB; कोहलीच्या उत्तराने मन जिंकलं

हैदराबादची खेळपट्टी नेहमीच फलंदाजीला पोषक अशी आहे. त्यामुळे आजचा सामना मोठ्या धावसंख्येचा होऊ शकतो. आयपीएलमध्ये देखील सनरायजर्स हैदराबादचा संघ २०२१ साली याच मैदानावर खेळला होता. आणि धासंखेचा पाठलाग करताना त्यांनी तो सामना जिंकला होता. त्यामैदानावर नेहमीच भारतीय संघाला चांगले यश मिळाले आहे.

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया

ॲरॉन फिंच (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ॲडम झम्पा