why India is wearing black band in today’s match IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. या कसोटीत नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारू संघाच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली आणि मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय सलामीवीर सॅम कोन्स्टासच्या फलंदाजीची जोरदार चर्चा होती, ज्याने पदार्पणच्या सामन्यातच अर्धशतक केले होते. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असून भारतीय संघ हातावर काळ्या पट्टी बांधून उतरला आहे, काय आहे यामागचं नेमकं कारण?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेलबर्न कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ वेळेत म्हणजेच भारतीय वेळेनुसार पहाटे ५ ला सुरू झाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ बाद ३१९ धावा केल्या होत्या. इथून पुढे ऑस्ट्रेलियाने आपल्या डावाला सुरूवात केली तर भारताकडून मोहम्मद सिराज प्रथम गोलंदाजीसाठी उतरला. यादरम्यान यष्टीरक्षण करत असलेली टीम इंडिया हातावर काळी पट्टी बांधून उतरली.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत काळी पट्टी बांधून का उतरला? (Why India is wearing black band in Today’s match)

भारताची माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं २६ डिसेंबरला रात्री उशिरा निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्य असल्याने २६ डिसेंबरला रात्री अचानक त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त एम्स रुग्णालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली म्हणून भारतीय संघ चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हातावर काळी पट्टी बांधून उतरला आहे.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाची चांगली सुरूवात केली आणि झटपट धावा केल्या. सिराजने गोलंदाजीला सुरूवात केली आणि त्याला एकच षटक टाकण्याची संधी मिळाली. तर पहिल्या दिवशी चांगली गोलंदाजी केलेल्या आकाशदीपने दुसऱ्या दिवशी धावा दिल्या. तर बुमराहने आपली भेदक गोलंदाजी कायम ठेवली. पॅट कमिन्स अर्धशतकाच्या जवळ तर स्मिथची नजर सलग दुसरे शतक करण्यावर आहे. ९७ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ६ बाद ३६५ धावा आहे. भारतीय संघाला जर सामन्यात टिकून राहायचे असेल तर स्मिथ-कमिन्समधील भागीदारी तोडण्याची आवश्यकता आहे.