एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर प्रथमच आज सचिनने जाहिरपणे भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल, असा विश्वास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सचिन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुटुंबीयांसोबत मसुरीमध्ये आला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली.
भारतीय संघाची सद्य कामगिरी पाहता, संघाला शुभेच्छांची आवश्यकता आहे आणि माझ्या संघाला शुभेच्छा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधून मी निवृत्ती स्वीकारली असली तरी मनाने त्यांच्याबरोबरच आहे. मला आशा आहे, की ईडन गार्डन्सवर भारतीय संघ जोरदार पुनरागमन करेल, असं सचिन तेंडुलकर म्हणाला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा