Shubman Gill scored a century in the Team India intra-squad match : टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बॉक्सिंग डेपासून सुरू होणाऱ्या या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया आपल्या संघांतर्गत सामने खेळत आहे, जेणेकरून सर्व खेळाडू आपली तयारी मजबूत करू शकतील. या कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून त्याची नजर दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्यावर असेल. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही आणि तिथे जिंकणे टीम इंडियासमोर मोठे आव्हान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुबमन गिलने झळकावले शतक –

दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ आंतर-संघ सामना खेळत आहे आणि याद्वारे भारतीय संघाला आपल्या सर्व उणिवा दूर करायच्या आहेत. या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने शतक झळकावले, जो प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका खेळणार आहे. शुबमन गिलने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० मालिकेत भाग घेतला होता, परंतु तो एकदिवसीय मालिकेचा भाग नव्हता, परंतु तो भारतीय कसोटी संघाचा सदस्य आहे.

या सामन्यात यशस्वी जैस्वालनेही अर्धशतकी इनिंग खेळली, तर कर्णधार रोहित शर्माही चांगली फलंदाजी करताना दिसला. रोहित शर्मा आता एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. गोलंदाजांबद्दल बोलायचे तर, भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना दिसला, जो या दौऱ्यावर टी-२० आणि एकदिवसीय संघात सहभागी नव्हता. जडेजा आणि शार्दुल ठाकूरसारखे खेळाडूही कसोटी संघाचा सहभागी आहेत.

हेही वाचा – IND vs SA 3rd ODI : विराटचा शिलेदार पदार्पणाच्या सामन्यात ठरला अपयशी, अवघ्या २२ धावा करुन परतला तंबूत

टीम इंडियाच्या बड्या खेळाडूंना विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह सारखे खेळाडू या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत. या कसोटी मालिकेत मोहम्मद शमी दिसणार नाही, जो आधीच अनफिट असल्यामुळे संघाबाहेर होता आणि त्याच्या जागी आकाश दीपला संघात संधी मिळाली. इतर गोलंदाजांमध्ये सिराज आणि मुकेश कुमार उपलब्ध असतील. इशान किशनही या कसोटी मालिकेतून बाहेर असून त्याच्या जागी केएस भरतचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताचा कसोटी संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएस भरत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप, मुकेश. जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.