आशिया चषकातील लागोपाठच्या दुसऱया पराभवानंतर भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनिल गावसकर यांनी संघाच्या कामगिरीवर ताशेरे ओढत कमी सरावामुळे अपयशाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुनिल गावसकर म्हणतात की, कामगिरी खराब होत असल्यामुळे संघाला अपयशाला सामोरे जावे लागत आहे. संघाने नावलौकिकाला साजेसा सराव केलेला नाही. त्यामुळे निकालही वाईट लागत आहे. संघात शिखर धवन आणि विराट कोहलीला वगळून इतर कोणीही हवा तसा परिश्रमी सराव केलेला नाही असेही गावसकर म्हणाले.
तसेच गरज नसतानाही भारतीय फलंदाज अविचारी शॉट्स खेळत आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला विजय मिळविणे सहज शक्य होत असल्याचेही ते म्हणाले.
संघाचे कर्णधारपद भूषविणे कोहलीला चांगले जमत आहे. त्या दृष्टीने तो फलंदाजीही करत आहे परंतु, संघातील इतर खेळाडूंनी संयमी आणि विचारी खेळी करणे आवश्यक असल्याचेही गावसकर म्हणाले.