Video : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा ही कायम आपल्या खेळामुळे चर्चेत असते. त्याबरोबरच सध्या तिच्याकडे असलेल्या ‘गोड’ बातमीमुळेही ती चर्चेत आहे. सानिया आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मालिक यांनी काही महिन्यापूर्वी ही गोड बातमी नेटिझन्सना दिली होती. त्यानंतर सानियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले. मात्र सोनियाची बहीण अनम मिर्झा हिने पोस्ट केलेला नवा व्हिडीओ साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सानियाची बहीण अनम हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्या व्हिडिओतून सानियाचे खेळावर किती प्रेम आहे ते दिसून येते. या व्हिडिओत सानिया गर्भवती असूनही टेनिस खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ कोणत्याही सामन्याचा नाही. किंवा कोणत्याही सरावाचा देखील नाही. पण अशा अवस्थेतही सानिया स्वतःला टेनिस खेळण्यापासून रोखू शकली नाही, याचे साऱ्यांना सर्वाधिक कौतुक आहे. सानियाची बहीण अनम मिर्झा हिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

याशिवाय, सानियाने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आपला एक सुंदर फोटो ट्विट केला आहे. या पोस्टमध्ये ‘तुम्ही खेळाडूला टेनिस कोर्टपासून दूर ठेऊ शकता, पण खेळाडूच्या आतील टेनिस त्याच्यापासून दूर ठेऊ शकत नाही’, असे कॅप्शनदेखील दिले आहे.

या फोटोत तिने एक गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोवर देखील प्रचंड लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.